spot_img
ब्रेकिंगकांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी? केंद्र सरकारने घेतला 'असा' निर्णय, वाचा सविस्तर

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी? केंद्र सरकारने घेतला ‘असा’ निर्णय, वाचा सविस्तर

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकारनं संयुक्त यूएईला म्हणजेच संयुक्त अरब अमीरातीला कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतलाय. परकीय व्यापार महासंचालनालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून अडचणीत होते. कांदा निर्यातीला केंद्र सरकारने बंदी घातली होती. यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे दर कोसळले होते. सुरुवातीला ही बंदी ३१ मार्च २०२४ पर्यंत होती. परंतु त्यात पुन्हा वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान सरकारच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने बांगलादेशला 50,000 टन आणि भूतानला 550 टन, बहरीनला 3,000 टन, मॉरिशसला 1,200 टन आणि यूएईला 14,400 टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महायुतीत खटकाखटकी! NCP कडून शिंदेसेनेचा टप्प्यात कार्यक्रम! उमेदवारच अजित पवारांच्या पक्षात गेला अन्…

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी केलेले अर्ज मागे घेण्यास आजपासून...

सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाय ; माजी आमदारपुत्राचं अजित पवारांना खुले आव्हान; सोलापुरात वातावरण तापलं

सोलापूर / नगर सह्याद्री - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक...

मोठी बातमी… नवाब मलिक यांना कोर्टाचा मोठा दणका… दाऊदच्या मालमत्ता प्रकरणात नेमकं काय घडलं?

मुंबई / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांना मुंबई सत्र न्यायालय विशेष...

शहाजी बापू संतापले; ‘भाजपचे राजकारण हिडीस अन् अबलेवर बलात्कार केल्यासारखे..’ नेमकं काय म्हणाले?

मुंबई / नगर सह्याद्री - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष...