spot_img
अहमदनगरनगरकरांना गुड न्यूज! 'या' कामांसाठी ५ कोटी ४० लाख मंजूर; MLA संग्राम...

नगरकरांना गुड न्यूज! ‘या’ कामांसाठी ५ कोटी ४० लाख मंजूर; MLA संग्राम जगताप यांची मोठी माहिती

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगर शहरातील रस्ते, गटार, पाईपलाईनसह रस्ता विद्युतीकरणासाठी विविध खाते अंतर्गत जिल्हा नियोजन मधून भरीव निधी मंजूर झाला आहे. केलेल्या पाठपुराव्यामुळे पाच कोटी 40 लाखांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. अहिल्यानगर शहरात होत असलेल्या विविध विकासकामांमुळे शहराची वाटचाल विकसित शहराच्या दृष्टीने होत आहे.

शहरांसह उपनगरातील रस्त्यांची कामे माग लागली असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. काही रस्ते, पाईपलाईन, विद्युतीकरणाची मागणी नागरिकांनी केली होती. त्यानुसार नागरिकांनी केलेल्या रस्ते, गटर, पाईपलाईन, आवश्यक असलेल्या विद्युतीकरणाची पाहणी करुन त्याकामांबाबत सरकार दरबारी, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. विविध खात्याअंतर्गत संबंधित कामासाठी निधी मंजूर झाला आहे. मंजूर झालेली कामे झाल्यानंतर अहिल्यानगरकरांना सोयीसुविधा मिळणार आहेत.

अहिल्यानगरकरांच्या सोयीसुविधांसाठी कटीबद्ध: आ. जगताप
गेल्या दहा वर्षांपासून शहरासह उपनगरातील विकास कामांचा बॅकलॉग भरुन काढण्याचे काम करत आहे. सरकारच्या माध्यमातून शहरात व उपनगरात होत असलेल्या विकासकामांमुळे नागरिकांना सोयी सुविधा मिळत आहेत. निवडणुकीपुरते नागरिकांना आश्वासन न देता प्रत्यक्ष काम करण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो. त्यामुळे अहिल्यानगरकरांना सोयीसुविधा देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शहराला भरीव निधी मिळत आहे. तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मधून अहिल्यानगर शहरात भरीव निधी मिळाला असल्याने आ. जगताप यांनी सरकारचे अन पालकमंत्री विखे पाटलांचे आभार मानले.

या कामांसाठी झाला निधी मंजूर
इंदिरानगर झोपडपट्टी येथील डीपी रस्ता विकसीत करणे दोन कोटी 79 लाख 40 हजार 973 रुपये, शिवाजी नगर पाण्याची टाकी ते गट क्रमांक 187/2 पर्यंत एचडीपीई पाईपलाईन टाकण्यासाठी 10 लाख 7 हजार 279 रुपये, प्रभाग क्रमांक 8 मधील वारुळाचा मारुती रोडवरील खंडोबा मंदिर ते मुख्य नाल्यापर्यंत 450 एमएसआरसी पाईप गटर करणेसाठी 36 लाख 42 हजार 661 रुपये, कल्याण रोडवरील गणेशनगर पाण्याची टाकी ते खंडोबा मंदिरापर्यंत 200 एमएसडीआय तसेच 160 एमएम व 110 एसएसएचडीपीई पाईपलाईन टाकणेसाठी 33 लाख 20 हजार 600 रुपये, प्रभाग 2 मध्ये सनी पॅलेस ते ओढ्यापर्यंत 300 एमएम गटर करणेसाठी 9 लाख 99 हजार 247 रुपये, गुलमोहर रोडवरील सुरभी हॉस्पिटल ते कुष्ठधामरोडपर्यंतच्या रस्त्यावर विद्युतीकरण करणेसाठी 69 लाख 94 हजार 974 रुपये अंदाजपत्रकीय रकमेस मंजुरी मिळाली आहे. तसेच प्रभाग दोन मधील गुरुकूल सोसायटी अंतर्गत अडाणे घर ते लोटके घर ते गुंदेचा घरापर्यंत रस्त्याचे कॉकिटीकरण करणेसाठी 65 लाख रुपये अशा या कामांसाठी विविध खात्या अंतर्गत जिल्हा नियोजनमधून मंजुरी मिळाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाराष्ट्रात अवकाळी संकट! या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट; कुठे कसं हवामान?

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यात सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. एकीकडे काही जिल्ह्यात तापमानाने...

लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढणार! नगर जिल्ह्यातील ‘या’ महिला ठरणार अपात्र?, कारण आलं समोर..

Ladki Bahin Yojana: राज्य सरकारने महिलांसाठी खास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे....

जलनायकांच्या ठेकेदारांनी निधी खिशात घातला!, पैसे खाणाऱ्यांचा बंदोबस्त करणार; मंत्री विखे पाटलांचा इशारा

संगमनेर । नगर सहयाद्री:- संगमनेर तालुक्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेसह इतरही पाणीपुरवठा योजनेची...

कोठला परिसरात ‘धक्कादायक’ घटना; पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल! नेमकं काय घडलं..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील कोठला, घासगल्ली येथे राहणार्‍या एका महिलेला मारहाण केल्याची घटना...