Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चर्चेत आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना आतापर्यंत ९ हप्ते आले आहेत. त्यानंतर आता महिला एप्रिलच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मूहूर्तावर येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ६ एप्रिलला रामनवमीच्या दिवशी पैसे येतील, असं वाटतं होतं. मात्र, रामनवमी उलटून गेली तरीही अद्याप पैसे जमा झाले नाहीत. दरम्यान, आता अक्षय तृतीयेच्या मूहूर्तावर महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात.
३० एप्रिल २०२५ रोजी अक्षय तृतीया आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे येतील, अशी माहिती समोर येत आहे. त्यात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात अक्षय तृतीया आहे. त्यामुळे हा मूहूर्त साधून याच दिवशी पैसे येऊ शकतात. अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते.
मात्र, याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही महिलांना २१०० देऊ, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. याचसोबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनीही याबाबत माहिती दिली होती. जाहिरनामा हा ५ वर्षांसाठी असतो. या काळात आम्ही लाडक्या बहिणींना कधीही २१०० रुपये देऊ. याचाच अर्थ असा की येत्या ५ वर्षात लाडक्या बहिणींना २१०० रुपये येऊ शकतात.