spot_img
ब्रेकिंगलाडक्या बहिणींसाठी Good News! ३००० रुपये खटाखट जमा?

लाडक्या बहिणींसाठी Good News! ३००० रुपये खटाखट जमा?

spot_img

Ladki Bahin Yojana:राज्य सरकारची लाडकी बहीण योजना सध्या खूप जास्त चर्चेत आहे. लाडकी बहीण योजनेत आजपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आज लाडक्या बहि‍णींना ३००० रुपये मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता आज वितरित केला जाणार आहे. दोन महिन्याचे मिळून एकत्र ३००० रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहि‍णींना खूप आनंद झाला आहे.

महिला दिनाचा मूहूर्त साधत राज्य सरकार महिलांच्या खात्यात पैसे जमा करणार आहे. महिला दिनाआधीच सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हावे, या उद्देशाने आजच सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवातदेखील झाली आहे. उरलेल्या सर्व महिलांच्या खात्यात आज पैसे जमा होती.लाडक्या बहि‍णींना ७ मार्च रोजी ३००० रुपये मिळणार याबाबत स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी केली होती.

या योजनेत सुमारे अडीच कोटी महिलांना ३००० रुपये दिले जाणार आहेत. या योजनेतून ९ लाख महिलांना अपात्र करण्यात आले आहे. अर्जांची पडताळणी केल्यानंतर या महिलांचे अर्ज बाद केले आहेत. त्यामुळे त्यांना योजनेचा हप्ता मिळणार नाही.लाडक्या बहिणींना २१०० रुपयांचा वाढीव हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. परंतु आता या अर्थसंकल्पात तरी लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळण्याची शक्यता कमी आहे. आम्ही लाडक्या बहिणींना या अर्थसंकल्पात २१०० रुपये देऊ, अशी घोषणा केली आम्ही कधीच केली नाही, असं आदिती तटकरे म्हणाल्या.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री विखेंवर भाजपची मोठी जबाबदारी; कोल्हेंना…

माजी खा. डॉ. सुजय विखे नगर दक्षिणचे, उत्तर नगर जिल्हा माजी आ. स्नेहलता कोल्हे...

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट? नेमकं काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का?...

पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

४ गुन्हे उघडकीस; ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत ​अहिल्यानगर /...

​घोसपुरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दागिन्यांसह मोठा ऐवज लंपास

​अज्ञात चोरट्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; परिसरात भीतीचे वातावरण ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री...