PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.आता लवकरच शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता मिळणार आहे. दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होऊ शकतो. दरम्यान, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड या राज्यात पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता वितरित केला आहे.
इतर राज्यातील शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, इतर राज्यातील शेतकऱ्यांना घाबरण्याची काही गरज नाही. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. पीएम किसान योजनेत दर चार महिन्यांनी पैसे जमा केले जातात.
वर्षभरात शेतकऱ्यांना ६००० रुपये जमा केले जातात. या योजनेत २०वा हप्ता २ ऑगस्ट रोजी जमा केला होता. हा हप्ता लांबणीवर गेला होता. जून महिन्याचा हप्ता जवळपास २ महिने उशिरा देण्यात आला होता. त्यामुळे यापुढचे हप्तेदेखील उशिरा येण्याची शक्यता वर्तवली जात होती.