spot_img
अहमदनगरशेतकऱ्यांना खुशखबर: कर्ज माफीची 'ती' यादी आली, जिल्हा बँकेचे चेअरमन कर्डीले काय...

शेतकऱ्यांना खुशखबर: कर्ज माफीची ‘ती’ यादी आली, जिल्हा बँकेचे चेअरमन कर्डीले काय म्हणाले पहा…

spot_img

सुनील चोभे / नगर सह्याद्री
नुकतीच राज्य शासनाकडुन जिल्ह्यातील महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना लाभार्थी कर्जदार शेतकऱ्यांची यादी बँकेस ३४७ रेकॉर्ड आधार प्रमाणीकरण करणेसाठी प्राप्त झालेले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना- २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या (विशिष्ट क्रमांक देण्यात आलेल्या) परंतु आधार प्रमाणीकरण न झालेल्या सभासदांना अप्पर आयुक्त व विशेष निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या पत्रानुसार दि. १३/०८/२०२४ ते दि.०७/०९/२०२४ पर्यंत आधार प्रमाणीकरण यादीतील कर्जदार सभासदांनी करुन घ्यावयाचे असुन यासाठी सुविधा सीएससी सेंटर वर उपलब्ध आहे. वरील कालावधीत संबंधित शेतकरी सभासदांनी योजनेचा लाभ घेण्याकरिता विना विलंब आपले आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे. असे अवाहन जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले, व्हाईस चेअरमन ऍड माधवराव कानवडे व मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी केले. ३४७ रेकॉर्ड धारक लाभार्थी शेतकरी सभासदांनी अधिक माहितीसाठी आपल्या प्राथमिक वि.का. सेवा संस्था किंवा नजीकच्या बँक शाखेशी संपर्क साधाण्याचे अवाहनही चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांनी केले.

याबाबत अधिक माहिती देतांना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रावसाहेब वर्पे यांनी सांगितले की, कर्जदार शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना महाराष्ट्र शासनाने राबविली व त्यानुसार शासन निर्णय जाहीर केला त्यामधील तरतुदीनुसार नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन २०१७-१८ सन २०१८-१९ आणि सन २०१९-२० हा कालावधी विचारात घेण्यात आला असुन या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज बँकेचे विहीत मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांना पीक कर्जाची रक्कम रु.५० हजारापेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन २०१८-१९ अथवा सन २०१९-२० या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमे इतका प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता दिलेली होती. अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन रु.५० हजार या कमाल मयदित प्रोत्साहनपर लाभ रक्कम निश्चित करण्यात आलेली होती.

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेने शासन निर्णयानुसार १७९२६० खाते वरील कालावधीत परतफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांचे रेकॉर्ड शासनाचे पोर्टलवर अपलोड केलेले होते. यापैकी १०१११४ सभासदांचे आधार प्रमाणीकरण साठी खाते प्राप्त झालेले होते व १००७६७ सभासदांची आधार प्रमाणीकरण करुन घेतले होते बँकेच्या माध्यमातुन ९२८११ सभासदांना रु.३२६.५२ कोटी प्रोत्साहनपर रक्कम सभासदांच्या सेव्हींग खाती जमा झाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

“काकाचं दर्शन घे, थोडक्यात वाचलास….”; अजित पवारांचा रोहित पवारांना टोला

मुंबई / नगर सह्याद्री - संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे....

मनोज जरांगे पुन्हा आक्रमक; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले की…

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग...

नुसती विधानपरिषद नको, तर कॅबिनेट मंत्रीपदच हवं; लक्ष्मण हाके नेमकं काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री - विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय झाला. महाविकास आघाडीचा राज्यात सुपडासाफ...

पारनेरकरांना खुशखबर! मंत्री विखे पाटील म्हणाले, पुढील काळात..

आ. काशिनाथ दाते यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घेतली भेट पारनेर | नगर सह्याद्री पारनेर...