spot_img
देशशेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! केंद्र सरकारची महत्वाची योजना; केवायसी करा? अन्यथा लाभ मिळणार...

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! केंद्र सरकारची महत्वाची योजना; केवायसी करा? अन्यथा लाभ मिळणार नाही..

spot_img

PM Kisan Yojana: केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरात ६००० रुपये मिळतात. या योजनेत दर चार महिन्यांनी पैसे दिले जातात. दरम्यान, आतापर्यंत या योजनेत १८ हप्ते देण्यात आले आहेत. आता लवकरच १९ वा हप्ता मिळणार आहे.

शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, पीएम किसान सन्मान योजनेचा १९ वा हप्ता २४ फेब्रुवारीला जमा केला जाणार आहे. याबाबत केंद्रिय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी माहिती दिली आहे. पीएम किसान सन्मान निधीचा शेवटचा हप्ता ऑक्टोबर महिन्यात देण्यात आला होता. त्यानंतर आता चार महिन्यांनी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात पैसे दिले जाणार आहेत.

या योजनेत आता १३ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे. मात्र,तुम्ही जर केवायसी केले असेल तरच तुमच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर जाऊन केवायसी करा. तुम्ही ऑनलाइन पद्धतीनेही केवायसी करु शकतात.

शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत व्हावी, उपकरणे घेण्यासाठी पैसे मिळावेत, या उद्देशातून ही योजना राबवण्यात आली आहे. देशातील कोट्यवधी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. महाराष्ट्रात अशीच एक नमो शेतकरी योजना आहे. ज्यामध्येही शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपये मिळतात.

ऑनलाइन पद्धतीने केवायसी कसं करायचं?
तुम्ही सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
त्यानंतर होमपेजवर लिहलेल्या ई- केवायसी या ऑप्शनवर क्लिक करा.
यानंतर आधार नंबर टाका सर्च करा.
यानंतर मोबाईल नंबर टाका. तुम्हाला ओटीपी येईल. यानंतर तुमची केवायसी प्रोसेस पूर्ण होईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सामान्यांचा आधारवड: आमदार अरुणकाका जगताप

अहिल्यानगर-  अरुणकाका आमदार अरुणकाका म्हणजे सामान्य जनतेचा आधारवड. गरिबांवरील अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा, गरीब आणि...

हवामान खात्याचा इशारा आला! नगर जिल्ह्याला ‘इतक्या’ दिवसाचा यलो अलर्ट

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा अजूनही कायम असून, हवामान विभागाने पुढील...

निष्ठावंतांचं केडर जपणारे काका पुन्हा होणे नाही!

काका म्हणाले होते, ‌‘जनतेचे आशीर्वाद अन्‌‍ प्रेम मला मिळाले, सचिन आणि संग्रामला माझ्या दुप्पट...

भारतीय सैन्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला; वाचा, स्पेशल रिपोर्ट

कर्नल सोफिया कुरेशी | पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी...