spot_img
ब्रेकिंगशेतकऱ्यांना खुशखबर; ६४ लाख शेतकऱ्यांना मिळणार २५५५ कोटी, मंत्री कोकाटे काय म्हणाले...

शेतकऱ्यांना खुशखबर; ६४ लाख शेतकऱ्यांना मिळणार २५५५ कोटी, मंत्री कोकाटे काय म्हणाले पहा

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
राज्यातील तब्बल ६४ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून, त्यांच्या खात्यावर थेट रु. २५५५ कोटी विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे. शासनाने विमा कंपन्यांना देय असलेला प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून रु. २८५२ कोटी वितरित करण्यास मान्यता दिली आहे.

या निर्णयामुळे मागील विविध हंगामांतील प्रलंबित नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा होणार आहे. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना विमा कंपन्यांना देण्यात आल्या असून, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार असल्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

या अंतर्गत खरीप २०२२ आणि रब्बी २०२२-२३ या हंगामांसाठी रु. २.८७ कोटी, खरीप २०२३ साठी रु. १८१ कोटी, रब्बी २०२३-२४ साठी रु. ६३.१४ कोटी आणि खरीप २०२४ साठी रु. २३०८ कोटी इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वितरित होणार आहे. एकूण रु. २५५५ कोटी रकमेचा लाभ राज्यातील ६४ लाख लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे.

शासनाने विमा कंपन्यांना निधी वितरित केला असून, नुकसान भरपाईची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे म्हणाले. शासनाने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई मिळणार आहे. यामुळे लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! वाल्मिक अण्णा कराडवर हल्ला; कारागृहात काय घडलं?

Walmik Karad: संतोष देशमुख हत्या आणि खंडणीप्रकरणी मकोका अंतर्गत अटकेत असलेल्या वाल्मिक कराडवर बीड...

भाजपच्या ‘बड्या’ नेत्याला धक्का; एकुलत्या एक मुलीने जीवन संपवलं

Today News: राजकीय वर्तुळातून अलीकडच्या काळात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना, आता एक...

महाराष्ट्रात अवकाळी संकट! या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट; कुठे कसं हवामान?

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यात सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. एकीकडे काही जिल्ह्यात तापमानाने...

लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढणार! नगर जिल्ह्यातील ‘या’ महिला ठरणार अपात्र?, कारण आलं समोर..

Ladki Bahin Yojana: राज्य सरकारने महिलांसाठी खास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे....