spot_img
अहमदनगरवीज ग्राहकांसाठी खुशखबर; दर कमी होणार...

वीज ग्राहकांसाठी खुशखबर; दर कमी होणार…

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महावितरणने पहिल्यांदाच वीज दर कपातीचा प्रस्ताव सादर केला असून, तो मंजूर झाल्यास पुढील पाच वर्षांत घरगुती विजेचे दर तब्बल २३ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. महावितरणने पुढील पाच वर्षांचे वीज दर ठरविण्यासाठीचा प्रस्ताव नुकताच वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. या प्रस्तावात, येत्या पाच वर्षात टप्प्याटप्प्याने वीज दर कमी करण्याचे नियोजन असून, सौरऊर्जेचा वापर वाढवून वीज उत्पादन खर्चात बचत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

महावितरणचाजवळपास ८५ टक्के खर्च हा वीज खरेदीवर होतो. कोळशावर आधारित वीज महाग असल्याने हा खर्च कमी करण्यासाठी सौरऊर्जेसारख्या अक्षय ऊर्जा स्रोतांकडे वळण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. भविष्यात १५ ते १६ हजार मेगावॅट वीज सौरऊर्जेच्या माध्यमातून तयार करण्यावर भर दिला जाणार आहे.सध्या महावितरणला दिवसा सरासरी दोन हजार मेगावॅट वीज सौरऊर्जेच्या माध्यमातून उपलब्ध होते. योग्य नियोजन आणि अंमलबजावणी केल्यास, भविष्यात यात मोठी वाढ होऊन वीज खरेदीवरील खर्चात लक्षणीय बचत होईल, असा विश्वास महावितरणने व्यक्त केला आहे.

प्रस्तावानुसार, येत्या पाच वर्षात घरगुती विजेचे दर २३ टक्क्यांनी कमी होणार आहेत. सर्वसाधारणपणे वीज दर दरवर्षी ८ ते १० टक्क्यांनी वाढणे अपेक्षित असते, परंतु सौरऊर्जेमुळे खर्चात बचत होऊन दर कमी ठेवणे शक्य होणार आहे. सध्या ९ रुपये ४५ पैसे प्रतियुनिट असणारा सर्वसाधारण दर पुढील पाच वर्षांत कमी होऊन ९ रुपये १४ पैसे इतका होईल. विशेषतः १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल, कारण त्यांचे दर ५ रुपये ८७ पैसे प्रतियुनिटपर्यंत कमी होतील असा अंदाज आहे.या वीज दर प्रस्तावासंदर्भात २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता सुनावणी होणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...