spot_img
अहमदनगरशनी देवाच्या भक्तांना खुशखबर! शनिशिंगणापूरातुन धावणार रेल्वे?, सर्वेक्षण अंतिम टप्यात..

शनी देवाच्या भक्तांना खुशखबर! शनिशिंगणापूरातुन धावणार रेल्वे?, सर्वेक्षण अंतिम टप्यात..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:
अहिल्यानगर ते संभाजीनगर या-८५ किलोमीटर नव्याने सुरू होत असलेल्या नियोजित रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण अंतिम करण्यात आले आहे. या मार्गावर आठ रेल्वेस्थानक उभारले जाणार आहेत. दरम्यान, नेवासा तालुक्यात चार रेल्वेस्थानक नेवाशासह श्रीक्षेत्र देवगड व शनिशिंगणापूर तीर्थस्थळांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.

मध्यंतरी संभाजीनगर येथे रेल्वे संदर्भात बैठकीत नव्याने सुरू होत असलेल्या नियोजित रेल्वेमार्गाच्या अंतिम सर्वेक्षण आढावा घेण्यात आला. बैठकीसाठी खासदार भागवत कराड, दक्षिण रेल्वे नांदेड विभागाचे व्यवस्थापक प्रदीप काळे, रेल्वेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

या रेल्वे मार्गासाठी तीन सर्वेक्षण झाले. त्यापैकी एक सर्वेक्षण अंतिम करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. संभाजीनगर-अहिल्यानगर या मार्गावर आठ रेल्वेस्थानक उभारण्यात येणार असून, संभाजीनगर स्टेशनवर १६ भोगीची पिटल लाईनऐवजी १८ भोगीची पीटल लाईन करण्यात येणार आहे. संभाजीनगर ते अहिल्यानगर या रेल्वेमार्गावर पांढरीपूल, डोंगरगण हे डोंगर भाग असल्याने येथे टनेल न उभारता ही लाईन वांबोरीमार्गे वळविण्यात येणार आहे.

अहिल्यानगर, शनिशिंगणापूर, उस्थळ दुमाला, नेवासा, देवगड, गंगापूर, वेसगाव, आंबेगाव, सरणापूर ही आठ रेल्वेस्थानके असणार आहेत. पुढील काही महिन्यात यावर शिकामोर्तब होऊन रेल्वे मार्गाचे काम सुरू होणार आहे. यासाठी ३ हजार २३८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असूनस यासाठी ६४० हेक्टर म्हणजे अंदाजे १५८३.४७ एकर जमिनीचे अधिग्रहण करण्यात येणार आहे.

राहुरी -शनिशिंगणापूर रेल्वे धावणार
राहुरी-शनिशिंगणापूर या २३ किलोमीटर नवीन सिंगल ब्रॉडगेट लाईन रेल्वेमार्गाचे नोव्हेंबर २०२३ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले तसेच या मार्गावरील माती दगड परीक्षणही झाले. रेल्वेमार्ग निश्चित करण्यात आला असून, काही महिन्यात भूमी अधिग्रहणा साठी संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा बजवल्या जाणार आहेत. अहिल्यानगर छत्रपती संभाजीगर व राहुरी, शनिशिंगणापूर हे दोन मार्ग रेल्वेने जोडले जाणार असल्याने शनिशिंगणापूर तीर्थक्षेत्रांना महत्त्व प्राप्त होणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरचे माफिया राज रोखण्यासाठी निवडणूकीत महायुतीला पाठबळ द्या : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

निघोज / प्रतिनिधी रेडबुलचा वापर करुण पारनेरचा माफियाराज माध्यमातून सर्वसामान्य जनतेला दादागीरीला सामोरे जावे लागत...

अखेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; मुश्रीफ यांची मोठी घोषणा

कोल्हापूर / नगर सह्याद्री : राज्य पातळीवर शरद पवार आणि अजित पवार गट वेगवेगळे असले...

निवडणुकीची रणधुमाळी! उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात; आघाडी-युतीचे तळ्यात मळ्यात

अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पालिकांसाठी हालचाली  अहिल्यानगर | नगर सह्याद्री जिल्ह्यातील 12 पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाजला...

अरणगाव शिवारात दोन गटात राडा; लोखंडी गज, काठीने मारहाण, वाचा प्रकरण?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर तालुक्यातील अरणगाव शिवारातील शिंदे मळा परिसरात दोन गटात शेतीच्या...