Ladki Bahin Scheme:राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. ही योजना फसवी नाही, ती सुरूच राहणार असून लवकरच 2100 रुपये हप्त्याचा लाभही महिलांना मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
महिला सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील महिलांना थेट आर्थिक मदत पोहोचवण्याचा आहे. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा घरातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो.
2024 च्या जुलैपासून योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून आतापर्यंत 9 हप्ते लाभाथ महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. यामध्ये प्रत्येकी 1500 रुपये देण्यात आले असून, मार्च महिन्याचाही हप्ता वितरित झाला आहे.
लाडकी बहीण योजना अजूनही सुरू आहे आणि आम्ही या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांपर्यंत थेट लाभ पोहोचवत आहोत. योजना सुरू असताना अनेकांनी तिला फसवी योजना म्हटलं, पण प्रत्यक्षात हजारो महिलांना मदत मिळाली आहे.
पात्रतेच्या निकषात बसणाऱ्या महिलांना नक्कीच फायदा मिळणार आहे. चारचाकी गाडी असणाऱ्या किंवा निकषात न बसणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही. पुढील काळात हप्त्याची रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये केली जाईल, आणि याची अंमलबजावणी लवकरच केली जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
या महिलांना फटका बसणार
नमो शेतकरी योजना अंतर्गत राज्यातील महिलांना वर्षाला 1200 रूपयांचा लाभ मिळतो. त्यामध्ये राज्य सरकार 6000 आणि केंद्र सरकार 6000 रूपये देत आहे. लाडकी बहीण योजनेच्या निकषानुसार, लाभाथ महिलांना वर्षाला 18 हजार रूपयांपेक्षा जास्त पैसे दिले जाणार नाहीत. आता 9 लाख महिलांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत वर्षाला 12000 हजार रूपये मिळतात, त्यात लाडकी बहीण योजनेचेही 18000 रूपये मिळतात, म्हणजे वर्षाला 30 हजार रूपयांचा लाभ राज्यातील 9 लाख महिलांना मिळतो. त्यामुळे राज्यातील 9 लाख महिलांना यापुढे लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रूपये नव्हे तर 500 रूपये दिली जाणार आहेत. राज्य सरकारकडून तसा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. माहिती प्रसारण विभागाने नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची यादी महिला बाल विकास मंत्रालयाकडे पाठवली आहे.