Ladki Bahin Yojana: विधानसभा निवडणुकीत महायुती सरकाराने प्रचंड बहुमताने विजय मिळवला. त्यानंतर राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन करण्यात आले आहे. महायुतीला निवडणुकीत मिळालेल्या यशामागे लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे. या योजनेनुसार, महिलांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपये जमा होऊ लागले. जुलैमध्ये सुरुवात झाली. मात्र, काहींना पैसे मिळाले तर, काहींच्या बँक खात्यात आधार नंबर लिंक नसणं किंवा इतर केवायसीसंदर्भात अपडेट न झाल्यानं रक्कम जमा झाली नाही. पण लवकरच लाडक्या बहिंणीच्या खात्यात ९६०० रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.
यामध्ये मागील पाच महिन्यांची १५०० रुपये रक्कम आणि डिसेंबरच्या महिन्याची २१०० रुपये रक्कम समाविष्ट होऊ शकते. निवडणूक काळात, सत्ताधाऱ्यांनी लाडकी बहिण योजनेचे लाभ १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. जर सरकारने या वाढीव रकमेची मंजुरी दिली, तर महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल.२८ जूनला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली होती.
या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रूपये जमा झाले. सप्टेंबर अखेरपर्यंत फॉर्म भरण्याची मुभा होती. नंतर फॉर्म भरण्याची मुदत संपली. ज्यांच्या खात्यात जुलैपासूनची रक्कम जमा झाली नाही, त्यांच्या खात्यात ७५०० हजार रक्कम जमा झाले. ज्याचा लाभ २ कोटी ३४ लाख महिलांना झाला. मात्र, अर्ज स्वीकारल्यानंतरही काही महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे अद्याप जमा झालेले नाहीत.
अशा लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची आणि तितकीच आनंदाची माहिती आहे. ज्यांचे अर्ज मंजूर झाले, पण अद्याप खात्यात रक्कम जमा झाली नाही, त्यांच्या खात्यात डिसेंबरचा कदाचित वाढीव हप्त्याची रक्कम आणि मागील पाच महिन्यांचे १५०० रुपये असे एकूण ९६०० रुपये जमा होऊ शकतात. पण त्यासाठी सर्व अटींची पूर्तता झालेली असावी.
सहावा हप्ता कधी मिळणार?
मंत्रिमंडळाचा विस्तार जरी झाला असला तरी, खातेवाटप होणं बाकी आहे. महिला व बाल विकास विभागाच्या मंत्र्यांच्या निवडीनंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात सहावा हप्ता जमा होईल, असं महिला व बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांनी अलीकडेच स्पष्ट केले होते. त्यामुळे अर्ज मंजूर झालेले पण अद्यापही ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही, त्यांच्या खात्यात एकूण सहा हप्त्यांची रक्कम म्हणजेच ९६०० रूपये जमा होतील. तसेच ज्यांच्या खात्यात ५ हप्त्यांची रक्कम जमा झालेली आहे, त्यांच्या खात्यात सहावा हप्ता म्हणजेच महायुतीने केलेल्या घोषणेनुसार, २१०० रूपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतात.