spot_img
अहमदनगरलाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! आता मिळणार बिनव्याजी कर्ज..

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! आता मिळणार बिनव्याजी कर्ज..

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई बँकेच्या माध्यमातून या योजनेच्या लाभार्थी महिलांना आता शून्य टक्के व्याजदराने 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. या निर्णयामुळे अनेक महिलांना छोट्या उद्योगांसाठी भांडवल मिळवणे सोपे होणार असून, त्यांचा आर्थिक सशक्तीकरणाचा मार्ग मोकळा होणार आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आत्मनिर्भर बनवणे हा आहे. याआधी या कर्जावर 9 टक्के व्याजदर आकारला जात होता, मात्र आता महिलांना कोणतेही व्याज द्यावे लागणार नाही. मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी ही माहिती दिली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्य सरकारच्या चार प्रमुख महामंडळांच्या माध्यमातून ही सुविधा देण्यात येणार आहे. यामध्ये अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटक्या विमुक्त महामंडळ, ओबीसी महामंडळ आणि पर्यटन महामंडळाच्या आई योजना यांचा समावेश आहे. या योजनांमधून महिलांना 12 टक्क्यांपर्यंत व्याजाचा परतावा दिला जातो.

प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, महिलांनी मुंबई बँकेत अर्ज केल्यानंतर त्यांचा व्यवसाय तपासण्यात येईल आणि त्यानंतरच कर्ज मंजूर होईल. 5 ते 10 महिला एकत्र येऊनही हा लाभ घेऊ शकतात. मुंबईत सध्या 12 ते 13 लाख महिला या योजनेच्या लाभार्थी असून, मुंबई बँकेचे सुमारे 1 लाख सभासद लाभार्थी आहेत. लवकरच या योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर महिलांना भांडवलाची मदत मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हा निर्णय महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात असून, लाडकी बहीण योजना आता केवळ सामाजिक नव्हे तर आर्थिक परिवर्तनाचं माध्यम ठरत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नारा महायुतीचा, तयारी स्वबळाची!; विखे-जगताप एक्सप्रेस सुसाट, कोतकरांची महापालिकेला एण्ट्री

भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या स्वतंत्र बैठका,  महाविकास आघाडीत शांतताच शांतता सुनिल चोभे | नगर सह्याद्री:- आगामी होऊ...

माझ्या नादी लागलीस तर तुझं सगळं गबाळ उचकीन; चित्रा वाघ यांच्या आरोपांना मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे....

ग्रामदैवत विशाल गणेश मंदिरात सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते बुधवारी ‌‘श्रीं‌’ची प्राणप्रतिष्ठा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- शहराचे ग्रामदैवत असलेल्या माळीवाडा येथील श्री विशाल गणेश मंदिर येथे गणेशोत्सवानिमित्त...

बाप्पाच्या आगमनापूर्वी पावसाचा जोर वाढला; 12 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा अलर्ट

मुंबई | नगर सह्याद्री गेल्या चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबई आणि पश्चिम उपनगरात पुन्हा एकदा जोरदार...