Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाथ महिलांना अखेर आजपासून फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्याच्या वितरणासाठी अर्थ विभागाकडून महिला व बालविकास विभागाला 3490 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. महिला व बालविकास विभागाकडून दोन दिवसांपूव तांत्रिक कारणामुळं हप्ता वितरीत करण्यात उशीर झाल्याचं सांगण्यात आलं होतं.
आता आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांना 1500 रुपये मिळतील. मात्र फेब्रुवारी महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या घटणार आहे. फेब्रुवारी महिन्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योनजेच्या वितरणासाठी 3490 कोटी रुपयांचा निधी अर्थ विभागाकडून देण्यात आला आहे. महिला व बाल विकास विभागाकडून हप्त्याची रक्कम वर्ग करण्यात येईल. फेब्रुवारी महिना संपण्यास अवघे दोन दिवस बाकी असताना हा हप्ता वर्ग करण्यास सुरुवात होणार आहे.
लाडकी बहीण योजनेचे निकष होते त्याची कठोर अंमलबजावणी करण्यात येत असल्यानं महिला लाभार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे. डिसेंबर महिन्यात ज्या राज्य शासनानं 2 कोटी 46 लाख महिलांच्या खात्यात रक्कम पाठवण्यात आली होती. त्यानंतर जानेवारी महिन्याचा विचार केला असता त्या महिन्यात 2 कोटी 41 लाख महिलांना लाभ देण्यात आला. म्हणजेच जानेवारी महिन्यात 5 लाख महिलांची संख्या घटली होती. त्यानंतर महिला व बाल विकास विभागानं केलेल्या पडताळणी प्रक्रियेत लाभाथ महिलांची संख्या आणखी 4 लाखांनी घटल्याची माहिती आहे. त्यामुळं साधारणपणे 2 कोटी 37 लाख महिलांना फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये मिळतील.
कागदपत्रांची पडताळणी सुरु
लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर महायुती सरकारनं मध्य प्रदेशात सुरु असलेल्या लाडली बहेना या योजनेच्या धतवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेची निवडणुकीपूव अंमलबजावणी सुरु करायची असल्यानं पहिल्यांदा अधिक महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये अर्ज भरुन घेऊन लाभाथची संख्या वाढवण्यावर दिला गेला. यामुळं पडताळणी न करता अर्ज भरुन घेतले गेले आणि महिलांना लाभाची रक्कम दिली गेली. राज्य सरकारनं जवळपास सहा हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात जमा केली. राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा आल्यानंतर लाभार्थ्यांची पडताळणी सुरु झाली. त्यामधून लाभाथ संख्या कमी होण्यास सुरुवात झाली.