अहमदनगर। नगर सहयाद्री
नगरकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शहरात दोन मोठे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. यासाठी अनेक दिवसांपासून लढा सुरू होता. अखेर आज त्या लढ्याला यश आले असून ते प्रश्न मार्गी लागले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे १४ जानेवारीला भूमीपूजन
शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा यासाठी दलित समाजाने विविध स्तरावर पाठपुरावा आंदोलने केली त्याला अखेर यश आले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमीपूजन १४ जानेवारी संपन्न होणार असून चौथरा उभारणी व सुशोभीकरण करण्यासाठी ५५.७६ लाखांच्या कामाला स्थायी समितीने सोमवारी झालेल्या सभेत मंजुरी दिली आहे.
सावेडीतील स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न अखेर मार्गी
गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेला सावेडी स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. सावेडी कचरा डेपोच्या जागेत सर्वसामान्यांसाठी स्मशानभूमी उभारण्यासाठी निधीचा प्रस्ताव पुढच्या स्थायी समितीच्या सभेत सादर करा, असे निर्देश सभापती गणेश कवडे व विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर यांनी बांधकाम विभागाला दिले.