spot_img
अहमदनगरनगरकरांना खुशखबर! शहराच्या विकासाला सरकारचे 'गिफ्ट', 'या' रस्त्यांसाठी १५० कोटी

नगरकरांना खुशखबर! शहराच्या विकासाला सरकारचे ‘गिफ्ट’, ‘या’ रस्त्यांसाठी १५० कोटी

spot_img

शहरातील रस्ता कामांसाठी १५० कोटींचा निधी
अहमदनगर। नगर सह्याद्री
नगर महापालिकेने डीपी रस्त्यांच्या विकास कामांसाठी पाठवलेल्या प्रस्तावातील कामांना राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने शहरातील डीपी रस्त्याच्या प्रकल्पाच्या फेज १ ला मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यातील १५० कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली असून आठ दिवसांत या कामांची निविदा प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती आ.संग्राम जगताप यांनी दिली.

आमदार संग्राम बोलताना पुढे म्हणाले की, महाराष्ट्र सुवर्णज्योत नगरोत्थान योजनेतून नगर महापालिकेला प्रथमच डीपी रस्त्यांच्या कामासाठी इतका मोठा निधी मिळाला आहे. राज्य सरकारने नगर शहराच्या विकासाच्या दृष्टीने मोठी भेट दिली आहे.

आ.संग्राम जगताप यांच्या निर्देशानुसार महापालिका हद्दीतील डीपी रस्त्यांसाठी महापालिकेने प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने आ.जगताप यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला. नगर शहरातील डीपी रस्ते प्राधान्यक्रमाने होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने त्यांनी मंत्रालय पातळीवर कायम संपर्कात राहून नगर शहरातील भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण कामाची मुहूर्तमेढ रोवली आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष सहकार्य लाभले.

उपमुख्यमंत्री अजित पवारांची साथ
आ.संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी पक्षात नेहमीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळीक कायम ठेवली आहे. मधल्या काळात झालेल्या पक्षांतर्गत राजकारणावेळीही ते अजित पवारांबरोबर राहिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपले विश्वासू असलेल्या आ.जगताप यांना विकासासाठी सहकार्य करत नगर मनपा हद्दीतील डीपी रस्त्यांच्या मंजूरीसाठी विशेष प्रयत्न केले.

ही कामे पूर्णत्वाकडे
यापूर्वी नगर शहरातील कोठी रोड, बालिकाश्रम रोड, टिळक रोड, स्वस्तिकचौक ते आनंदऋषीजी महाराज समाधीस्थळ रस्ता, छ. शिवाजी महाराज चौक ते शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिर मिरवणूक मार्ग रस्ता, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, केडगाव देवी रस्ता, केडगाव लिंक रोड, पुणे महामार्ग ते कल्याण महामार्गापर्यंत, केडगाव अर्चना हॉटेल ते नेप्ती बाजार समिती रस्ता, महेश टॉकीज रस्ता, तारकपूर ते राधाबाई काळे महिला कॉलेज, सराफ बाजार रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून शहरात टप्पाटप्प्याने डीपी रस्त्याची कामे मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...