spot_img
महाराष्ट्रRadhakrishna Vikhe Patil : पशुपालकांना खुशखबर; शासनाने घेतला मोठा निर्णय, मंत्री विखे...

Radhakrishna Vikhe Patil : पशुपालकांना खुशखबर; शासनाने घेतला मोठा निर्णय, मंत्री विखे पाटील काय म्हणाले पहा..

spot_img

राहाता | नगर सह्याद्री
Radhakrishna Vikhe Patil : राज्यातील अनेक भागांत पावसाचे आगमन झाले असले, तरी अनेक विभागात अद्याप पावसाचे प्रमाण समाधानकारक नसल्याने राज्यातील १२४५ महसुली मंडळांमध्ये चारा डेपो उभारण्यास शासनाने परवानगी दिल्याची माहिती महसूल तथा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पालकमंत्री विखे पाटील यांनी लोणीत बोलताना याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की सरकार नेहमी शेतकर्‍यांच्या हितासाठी सदैव तत्पर राहील. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून राज्यात विविध ठिकाणी पावसाला सुरवात झाली आहे. असे असले तरी पावसाचे प्रमाण अद्यापही समाधानकारक नसल्याने अनेक गावांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सध्या राज्यात ५१८.१२ लाख टन हिरवा आणि १४४.५५ लाख टन सुका चारा उपलब्ध आहे. हा चारा जून अखेरपर्यंत पुरेल, असा अंदाज शासनाकडून व्यक्त केला गेला आहे.

चार्‍याचे प्रमाण कमी होत असताना शेतकर्‍यांना आणि पशुपालकांना जनावरांचे पालनपोषण करताना येणार्‍या अडचणी कमी व्हाव्यात म्हणून ३१ ऑगस्टपर्यंत, पावसाचे प्रमाण समाधानकारक होईपर्यंत दुष्काळसदृश भागात चारा डेपो उभारून शेतकर्‍यांना दिलासा देण्याची मागणी आम्ही केली होती.

नुकत्याच पार पडलेल्या पर्जन्यमान आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यास मान्यता देऊन शासन निर्णय काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार चारा डेपो संदर्भात शासनाने शासन निर्णय जाहीर करत चारा डेपो उभारण्यास परवानगी दिली आहे, असे विखे पाटील यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Ahmednagar Politics News: राष्ट्रवादीचे संपत बारस्कर आंदोलन छेडणार! कारण काय? वाचा सविस्तर

Ahmednagar Politics News; सावेडी उपनगर परिसरात बंधन लॉन ते राजवीर चौक ते भिस्तबाग महाल...

Ahmednagar Accident News: अहमदनगरमध्ये भीषण अपघात? तीन ठार; दोन गंभीर..

Ahmednagar Accident News: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदाता लुक्यातील पारगाव रस्त्यावर एक ते दीड तासाच्या अंतराने...

Pitru Paksha: पितृपक्षात श्राद्ध विधी करणे गरजेचा का आहे? महाभारताच्या १३ व्या अध्यायात नेमकं काय? जाणून घ्या

Pitru Paksha : पितृ पक्षाच्या काळात व्यक्तीने आपल्या पितरांच्या मोक्ष आणि समाधानासाठी श्राद्ध, तर्पण...

Ahmednagar Crime: खळबळजनक! पोलिसांना मध्यस्थी भोवली! आरोपींकडून मारहाण; कुठे घडला प्रकार?

Ahmednagar Crime: कोपरगाव तहसील कार्यालयात शेजारी असलेल्या लॉकपगार्ड येथे आरोपी आपापसात भांडत करत असतांना...