spot_img
अहमदनगरबैलगाडा शर्यत प्रेमींना दिलासादायक बातमी; आयोजनातले अडथळे दूर होणार, सुजित झावरे पाटील...

बैलगाडा शर्यत प्रेमींना दिलासादायक बातमी; आयोजनातले अडथळे दूर होणार, सुजित झावरे पाटील यांचा पुढाकार

spot_img

प्रांताधिकाऱ्यांना परवानगीचे अधिकार देण्याची मागणी यशस्वी; शेतकऱ्यांना दिलासा
पारनेर | नगर सह्याद्री
शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या बैलगाडा शर्यतींच्या आयोजनात येणाऱ्या अडचणींवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सुजित झावरे पाटील यांनी पुढाकार घेतला. शर्यतींच्या परवानगीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीशिवाय प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने आयोजनात अडथळे येत होते. यामुळे काही वेळा शर्यत रद्द होण्याची नामुष्की ओढवत होती.

या समस्येवर मात करण्यासाठी सुजित झावरे पाटील यांनी बैलगाडा शर्यतींच्या परवानगीचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना देण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीला त्वरित प्रतिसाद देत जिल्हाधिकारी यांनी प्रांताधिकाऱ्यांना शर्यतीच्या परवानगीबाबतचे अधिकार देण्याच्या सूचना दिल्या. यामुळे बैलगाडा चालक-मालक संघटनेचा कागदपत्रांचा किचकट प्रवास आता सुकर होणार आहे. पारनेर तहसील कार्यालयातच बैलगाडा शर्यतीची परवानगी मिळणार आहे.

या यशस्वी प्रयत्नांमुळे तालुक्यातील बैलगाडा शौकीन आणि शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या प्रश्नाला माग लावल्याबद्दल तालुक्यातील बैलगाडा शौकीनांच्या वतीने सुजित झावरे पाटील यांचा जंगी सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभात बाळशिराम पायमोडे, धोंडीभाऊ झावरे, नवनाथ पायमोडे, अवि झावरे, जयसिंग जाधव, पियुष कोकाटे, तुकाराम झावरे उत्तम तळेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुजित झावरे पाटील यांच्या या कार्यामुळे शेतकरी आणि बैलगाडा शौकीनांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे बैलगाडा शर्यतींचे आयोजन आता अधिक सुलभ आणि नियमबद्ध होणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये चाललंय काय? डिलिव्हरी बॉयवर सपासप वार, वडारवाडीत राडा, मुकुंदनगरमध्ये प्राणघातक हल्ला, वाचा क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील केडगाव परिसरात घरासमोर पार्क केलेली टाटा हॅरियर गाडी रात्रीच्या...

शनि शिंगणापूर मंदिर कार्यालयास ठोकले सील; कलेक्टरांकडून ‘देऊळ कार्यालय बंद’

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - शनी शिंगणापूर देवस्थानचे कार्यालय जिल्हा प्रशासनाकडून सील करण्यात आले...

नगरकरांनो सतर्क राहा! जिल्ह्यासाठी यलो अलर्ट, हवामान खात्याची महत्वाची अपडेट..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक 27 ते 29 सप्टेंबर 2025...

मर्चंट्‌‍स बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीत; सभासदांनासाठी खुशखबर, बँक काय देणार भेट?, वाचा सविस्तर

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सुवर्णमहोत्सवी वर्ष पूर्ण करणाऱ्या अहमदनगर मर्चंट्‌‍स बँकेला रिझर्व्ह बँकेने शेड्युल्ड बँकेचा...