Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना १५०० रुपये दिले जाणार आहेत. या योजनेत विधानसभा निवडणुकीनंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता दिला जाणार होता. तर याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे.
लाडकी बहीण योजनेत ३५ लाख महिलांना पैसे दिले जाणार आहेत. या योजनेत डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सहावा हप्ता येणार असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर आता पैसे जमा होण्यास आजपासून सुरुवात होणार आहे.
लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता याच आठवड्यात दिला जाणार आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत महिलांच्या अकाउंटला पैसे जमा केले जातील, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले होते.त्यानंतर आता ही प्रक्रिया सुरु झाली आहे. लाडकी बहीण योजनेत सहावा हप्ता वितरणाची प्रक्रिया आजपासून सुरु होणार आहे.
महिला व बालविकास खात्याचं वाटप झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरणास सुरुवात झाली आहे. आदिती तटकरे यांना महिला व बालविकास खाते देण्यात आले आहे. खातेवाटप झाल्यानंतर लगेचच महिलांना पैसे मिळतील, असं सांगितलं होतं. त्यानंतर आता याच आठवड्यात महिलांना १५०० रुपये दिले जाणार आहे.