Ladki Bahin Yojana : महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. 31 डिसेंबरपर्यंत या प्रक्रियेची मदत वाढवण्यात आल्याने अनेक महिलांना दिलासा मिळाला. मात्र असं असलं तरी नोव्हेंबर महिन्याचे 24 दिवस उलटूनही महिलांच्या खात्यात यावेळचे 1500 रुपये काही जमा झालेलेल नाहीत. हा महीना संपायला अवघे 5-6 दिवस उरलेत, तरी त्यांच्या नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत काहीच तपशील कळत नव्हते. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र आता या लाडक्या बहिणींसाठी एक गुड न्यूज समोर आली असून, त्यांना आता डबल गिफ्ट मिळणार आहे.
लाडक्या बहिणींना नोव्हेंरचे पैसे अद्याप न मिळाल्याने चिंतेचं वातावरण होतं, त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकांची तारीख घोषित झाल्याने आचारसंहिताही सुरू आहे. त्यामुळे नोव्हेंबरचे पैसे कधी मिळणार, आत्ता मिळणार की नाही, असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात घुमत होते. पण आता काळजीचं कारण नाही. माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्यांवर निवडणूक आचारसंहितेचा परिणाम होणार नाही अशी माहिती समोर आली आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महाराष्ट्रातील ‘लाडक्या बहिणीं’ना डबल गिफ्ट मिळणार आहे. प्रशासनाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.
त्यानुसार, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जर उशीरा जमा झाला तर, लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये एकत्र दिले जाण्याची शक्यता व्यक्त होते आहे. त्यामुळेच लाडक्या बहिणींना पुढील महिन्यात ‘डबल गिफ्ट’ मिळण्याची शक्यता वाढली आहे. पण लाडकी बहीण योजनेचा हप्ता आणि पैसे मिळवण्यासाठी आता ईकेवायसी करणे अनिवार्य आहे. ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर मिळणारे पैसे रोखण्यात येऊ शकतात. ईकेवायसी पूर्ण न झाल्यास या योजनेचा आत्तापर्यंत लाभ घेणाऱ्या महिलांना आता योजनेचा लाभ मिळणार नाही.
सप्टेंबर महिन्यात ई-केवायसीची घोषणा करण्यात आली होती, त्यासाठी 18 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र तोपर्यंत लाखो महिलांचे ई-केवायसी पूर्ण झाले नव्हेत, विविध कारणांमुळे ते रखडले होते. त्यामुळे आता ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदत वाढवण्यात आली असून आता पात्र महिलांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. तोपर्यंत प्रक्रिया पूर्ण केली नाही तर मात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.



