spot_img
ब्रेकिंगभिगारकरांना खुशखबर; भाजपच्या पाठपुराव्याला यश, एसटी महामंडळाचा ‘मोठा’ निर्णय

भिगारकरांना खुशखबर; भाजपच्या पाठपुराव्याला यश, एसटी महामंडळाचा ‘मोठा’ निर्णय

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :-
भिंगार शहरातून जाणाऱ्या सर्व एसटी बस गाड्यांना भिंगारमध्ये थांबा देण्याचे आदेश विभाग नियंत्रक अधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच भिंगार येथील बसस्थानकाच्या दुरुस्तीसाठी विभागीय स्थापत्य अधिकाऱ्यांना कळविण्यात आले असल्याचे लेखी पत्र अहिल्यानगर विभाग नियंत्रक अधिकारी यांनी भिंगार भाजापाचे मंडल अध्यक्ष सचिन जाधव यांना दिले आहे. भाजपाच्या भिंगार मंडलाच्या पाठपुराव्यास यश आले असून सर्व एसटी गाड्या आता भिंगार स्थानकात थांबत आहेत.

भिंगार भाजप मंडलाच्या वतीने भिंगार शहरातून जाणाऱ्या एसटी बस गाड्या भिंगारमध्ये थांबात नसल्याने प्रवाश्यांची मोठी गैरसोय होत असल्याचे निवेदन काही दिवसांपूव अहिल्यानगर विभाग नियंत्रक अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. या निवेदनाची दखल घेऊन राज्य परिवहन विभाग नियंत्रक अधिकारी यांनी आदेश दिले आहेत.

या पत्रात नमूद केले आहे की, भिंगार मार्गे जाणाऱ्या सर्व एसटी गाड्या भिंगार बसस्थानकात जाऊन प्रवासी चढ-उतार करण्याबाबत सूचित करण्यात येत आहे. अहिल्यानगर पाथड व अहिल्यानगर शेवगाव या मार्गावरील भिंगार मार्गे जाणाऱ्या सर्व बसेस जाता येता भिंगार येथे थांबवून प्रवासी चढ-उतार करण्याच्या सूचना करण्यात येत आहेत. प्रवाशांची विद्यार्थ्यांची कोणतीही तक्रार उद्भवणार नाही याची दक्षता सर्व वाहक व चालकांनी घ्यावी, असे आदेश दिले आहेत.

याबाबत भिंगार भाजपाचे मंडल अध्यक्ष सचिन जाधव यांनी विभाग नियंत्रक अधिकाऱ्यांचे आभार मानले असून भिंगार बसस्थानकाचे दुरुस्तीचे काम लवकरात लवकर काम हाती घेऊन प्रवाश्यांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगरमध्ये राडा! १५ जणांच्या टोळक्याचा तरुणावर गँगस्टर हल्ला; सीसीटीव्हीत प्रकार झाला कैद!, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नगर तालुक्यातील कामरगाव शिवारात जुन्या कोर्ट प्रकरणातील वैरातून अन्सार रहीम...

पत्नीचा कुर्‍हाडीने घेतला जीव! भल्या पहाटेच शहरात भयंकर प्रकार..

संगमनेर | नगर सहयाद्री :- तालुक्याच्या पठारभागातील घारगाव येथे चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा...

माणिकराव कोकाटे यांना ‘धक्का’!; राज्याला मिळाले नवे कृषीमंत्री, वाचा सविस्तर

मुंबई | नगर सहयाद्री राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात अखेर फेरबदल झाला. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीतील होणार घाटा; तुमच्या राशीत काय? वाचा सविस्तर

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाºया...