नगर सह्याद्री वेब टीम
बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी मंगळवारी मोठी बातमी आली आहे. त्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ जाहीर करण्यात आली आहे. इंडियन बँक असोसिएशननं (IBA) 10 जून 2024 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे याची घोषणा केली. या घोषणेनुसार हा महागाई भत्ता १५.९७ टक्के इतका असणार आहे.
आयबीएने यासंदर्भात एक परिपत्रक जारी करून माहिती दिली आहे. म्हणजे या महिन्यात पगारात बंपर वाढ होणार आहे. इंडियन बँक्स असोसिएशन च्यावतीने, बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मे, जून आणि जुलै महिन्यांसाठी १५.९७ टक्के दराने डीए मिळेल. लागू होणाऱ्या वेतनवाढीचा फायदा तब्बल 8 लाख बँक कर्मचाऱ्यांना होणार आहे.
यासोबतच परिपत्रकात असे सांगण्यात आले आहे की ०८ मार्च २०२४ रोजी झालेल्या १२ व्या द्विपक्षीय कराराच्या कलम १३ आणि संयुक्त नोटच्या कलम २ नुसार महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे.बँक कर्मचाऱ्यांना डीए वाढीची भेट मिळाली आहे, मात्र त्यांच्या आणखी एका मागणीवर निर्णय होणे बाकी असून ती दीर्घकाळ प्रलंबित आहे.