PM kisan Sanman Nidhi Scheme: केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात देण्यात येणार आहे. या योजनेचा हप्ता कधी येणार याची तारीख आता समोर आली आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी खास पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात ३ हप्ते दिले जातात. प्रत्येक हप्त्यात दोन-दोन हजार रुपये दिले जातात. या योजनेबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. या योजनेचा १९ वा हप्ता कधी येणार त्याची तारीख समोर आली आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेत दर चार महिन्यांनी पैसे दिले जातात. याआधीचा १ ८वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात देण्यात आला होता. त्यानंतर १९वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात येईल, अशी आशा होती. दरम्यान, या योजनेच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ फेब्रुवारी रोजी बिहार दौऱ्यावर असणार आहे. याच दिवशी पीएम किसान सन्मान निधीचा १९वा हप्ता दिला जाऊ शकतो. या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात २-२ हजार रुपये ट्रान्सफर केले जातील. या योजनेबाबत अधिकृत वेबसाइटवर लवकरच माहिती देण्यात येईल.