spot_img
ब्रेकिंगबळीराजाला आनंदवार्ता! हवामान विभागाच्या माहितीमुळे चेहऱ्यावर आनंद झळकणार..

बळीराजाला आनंदवार्ता! हवामान विभागाच्या माहितीमुळे चेहऱ्यावर आनंद झळकणार..

spot_img

मुंबई \ नगर सहयाद्री-
शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी समोर आली आहे. मान्सूनची वाटचाल वेळेपूर्वी सुरु आहे. नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार आहे. मान्सूनची वाटचाल अशीच राहिली तर यंदा वेळेपूर्वी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून १९ मे (रविवार) पर्यंत अंदमानात दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाचे माजी प्रमुख माणिकराव खुळे यांनी दिली. यामुळे शेतकरी राजाच्या चेहऱ्यावर आनंद झळकणार आहे.

हवामान विभागाचे माजी प्रमुख माणिकराव खुळे यांच्या माहितीनुसार,दक्षिण बंगालच्या उपसागरात निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मान्सूनच्या हालचाली दिसून येत आहे.

दरवर्षी मान्सून २२ मे पर्यंत दाखल होतो. सध्या दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर समुद्र सपाटीपासून १ ते १.५ किलोमीटर उंचीवर नैऋत्येकडून येणारे वारे सुरु आहे. हे वारे मान्सून येणार असल्याची सूचना देतात.

पुढील दोन दिवसांत अंदमान बेट आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनची अधिक प्रगती होणार आहे.तसेचज नैऋत्य मोसमी वारे देशाच्या महासागरीय क्षेत्रात म्हणजेच बंगालच्या उपसागरात दस्तक देणार आहे.

यामुळे १ जून रोजी सरासरी तारखेला देशाच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजे केरळला मान्सून येणार आहे. बंगालच्या उपसागरात मान्सूनची वाटचाल कशी राहिल, यावर १ जूनची तारीख निश्चित ठरवली जाणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...