PM kisan Sanman Nidhi Scheme: राज्यातील बळीराजासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. येत्या वर्षात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.योजनेत जर सरकारने रक्कम वाढवली तर तर शेतकऱ्यांना खूप दिलासा मिळणार आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सध्या ६००० रुपये मिळतात. ही रक्कम ८००० रुपये केली जाऊ शकते. पीएम किसान सन्मान निधी योजनेतील रक्कम वाढवावी, अशी मागणी देशातील शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे येत्या काळात ही रक्कम वाढवली जाऊ शकते.अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी या वर्षाच्या सुरुवातीलाच सांगितले होते की, पीएम किसान योजनेला जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहचवायचे आहे.
त्यांनी पैसे वाढवणार असल्याचे सांगितले नव्हते. परंतु कदाचित या नवीन अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली जाऊ शकते. सरकार सध्या शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपये देते. परंतु वर्षाला ८००० देण्याचा विचार सरकार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत १८ वा हप्ता देण्यात आला होता. त्यानंतर शेतकरी १९ व्या हप्त्याची वाट पाहत आहे. हा हप्त फेब्रुवारी २०२५ मध्ये येऊ शकतो. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करणे हे यामागचे मुख्य उद्देश आहे.