मुंबई। नगर सहयाद्री-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार दि. ९ जून रोजी पंतप्रधान पदाची शपत घेतली. त्यांनी आज सोमवार दि. १० रोजी पंतप्रधान पदाचा पदभार स्विकारल्यानंतर बळीराजाला खुशखबर दिली आहे. शेतकऱ्यांसाठी मोठे गिफ्ट देत पंतप्रधान किसान निधीच्या १७ व्या हप्याला मंजुरी दिली असून २० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत.
रविवार दि. ९ जून रोजी एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. शपथविधी सोहळ्यामध्ये महाराष्ट्राच्या सहा शिलेदारांना देखील स्थान मिळाले आहे. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्विकारला. तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान निधीच्या 17 व्या हप्त्याला मंजुरी दिली आहे.
पीएम किसान योजनेमुळे देशातील 9.3 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार असून सुमारे २० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी आम्हाला पुढील काळात शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे असल्याचे देखील म्हणाले आहे.