spot_img
महाराष्ट्रबळीराजासाठी आनंदाची बातमी! जुलै महिन्यात कसा असणार पाऊस? हवामान खात्याचा अंदाज वाचा...

बळीराजासाठी आनंदाची बातमी! जुलै महिन्यात कसा असणार पाऊस? हवामान खात्याचा अंदाज वाचा एका क्लिकवर..

spot_img

देशभरात मान्सूनचे आगमन। पुढील तीन दिवसांत कोकण। विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस
मुंबई। नगर सहयाद्री
संपूर्ण देशात मान्सूनने आगमन केले असून, पुढील तीन दिवसांत कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार जुलै महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल.

विशेष म्हणजे, जुलै महिन्यात राज्यातील कोणत्याही जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता नाही. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत सरासरी १०६ टक्के पावसाची शक्यता आहे. नंदुरबार, नाशिक, धुळे, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर या भागांतही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पूर्व सोलापूर, परभणी, लातूर, धाराशिव, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे.

विदर्भातील बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत जुलै महिन्यात १०६ टक्के पावसाची शक्यता आहे. या अंदाजामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, हा अंदाज कितपत खरा ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

आजचा पावसाचा इशारा
भारतीय हवामान खात्याने आज मुंबईसह उपनगर, पुणे, रायगड आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सामान्यांचा आधारवड: आमदार अरुणकाका जगताप

अहिल्यानगर-  अरुणकाका आमदार अरुणकाका म्हणजे सामान्य जनतेचा आधारवड. गरिबांवरील अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा, गरीब आणि...

हवामान खात्याचा इशारा आला! नगर जिल्ह्याला ‘इतक्या’ दिवसाचा यलो अलर्ट

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा अजूनही कायम असून, हवामान विभागाने पुढील...

निष्ठावंतांचं केडर जपणारे काका पुन्हा होणे नाही!

काका म्हणाले होते, ‌‘जनतेचे आशीर्वाद अन्‌‍ प्रेम मला मिळाले, सचिन आणि संग्रामला माझ्या दुप्पट...

भारतीय सैन्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला; वाचा, स्पेशल रिपोर्ट

कर्नल सोफिया कुरेशी | पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी...