spot_img
अहमदनगरबळीराजाला खुशखबर! सरकारचा अध्यादेश 'तो' जारी, नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मिळणार लाभ

बळीराजाला खुशखबर! सरकारचा अध्यादेश ‘तो’ जारी, नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मिळणार लाभ

spot_img

बळीराजाला खुशखबर! सरकारचा अध्यादेश ‘तो’ जारी, नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मिळणार लाभ

अहमदनगर | नगर सह्याद्री

महायुती सरकारने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-२०२४चा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. या योजनेद्वारे ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपाना पूर्णत: विनामूल्य वीज पुरवली जाणार आहे. एप्रिल २०२४ पासून या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. याबाबतचा अध्यादेश काल जारी करण्यात आला आहे. नगर जिल्ह्यासह राज्यातील ४४ लाख ३ हजार शेतकर्‍यांना याचा लाभ होणार आहे.

महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकर्‍यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या वेळी १०/८ तास किंवा दिवसा ८ तास थ्री फेज विजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांवर येणार्‍या वीज बिलाचा भार उचलण्यासाठी शासनाने राज्यातील ४४ लाख ३ हजार शेतकर्‍यांच्या ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाणार आहे. यासाठी साधारण १४ हजार ७६० कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

दरम्यान ही योजना पाच वर्षांसाठी म्हणजेच एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ पर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.परंतु ३ वर्षांच्या कालावधीनंतर या योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.यासाठी राज्यातील ७.५ अश्वशक्ती पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार आहे. या योजनेची अंमलबजावणी एप्रिल २०२४ पासून ७.५ अश्वशक्ती पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे. शासनास विद्युत अधिनियम २००३, कलम ६५ अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कंटेनर चालकाचा प्रताप; दहा ते पंधरा गाड्यांना धडक, अनेकजण जखमी

पुणे / नगर सह्याद्री - चाकण शिक्रापूर रस्त्यावर भरधाव मालवाहतूक करणाऱ्या कंटेनरने दहा ते पंधरा...

मनपाचा ‘तो’ निर्णय अन्यायकारक! शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन जाधव म्हणाले, जनतेवर बोजा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेने सर्वसामान्य नागरिकांकडून दुपटीने पाणीपट्टी लागू करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी...

.. तर नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल; अविनाश घुले यांचा मनपाला इशारा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर शहरातील नागरिकांना रोज पाणी पुरवठा करावा आणि मगच पाणीपट्टीत वाढ...

कोरठण खंडोबा यात्रोत्सव उत्साहात; लाखो भाविकांनी घेतले दर्शन

पारनेर | नगर सह्याद्री:- पिंपळगाव रोठा ता पारनेर येथील राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र...