Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप प्रसिद्ध झाली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेत डिसेंबरचा हप्ता महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देण्यात आला होता. त्यानंतर जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मकरसंक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, आता जानेवारीचे १५ दिवस उलटून गेले आणि मकरसंक्रांतदेखील उलटून गेली परंतु अजूनही पैसे महिलांच्या अकाउंटला जमा झाले नाहीत म्हणून महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र, आता जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याची तारीख ठरली आहे.
जानेवारीचा हप्ता २६ तारखेला जमा होणार
२६ जानेवारीच्या आधीपासूनच आम्ही लाडक्या बहिणींना हप्ता देणार आहोत. या महिन्यात १५०० रुपये मिळणार आहेत.आम्ही आमच्या घोषणा पत्रात दिलेल्या सर्व योजना लोकांना देत आहोत. आता आम्ही फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची तयारी करत आहोत. असं आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.