spot_img
ब्रेकिंगलाडक्या बहिणींना खुशखबर; 'त्या' महिलांच्या खात्यावर 4500...

लाडक्या बहिणींना खुशखबर; ‘त्या’ महिलांच्या खात्यावर 4500…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे दुसऱ्या टप्प्यातील पैसे महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काल गुरुवारी (दि. 29 ऑगस्ट) रोजी देखील अनेक महिलांच्या खात्यावर दोन हप्त्यांचे 3 हजार रुपये जमा झाले आहेत. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा शिंदे सरकारने केली आहे.

ही योजने जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली आहे. दरम्यान, आता या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या बँक खात्यावर पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत रक्षाबंधनच्या काही दिवसांआधी महिलांच्या बँक खात्यात पैसे पाठवण्यास सुरुवात झाली होती. या पहिल्या टप्प्यात 31 जुलैपर्यंत अर्ज केलेल्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये देण्यात आले. त्यानंतर ऑगस्टमध्ये फाॅर्म भरलेल्या महिलांच्या खात्यावर आता पैसे जमा होत आहेत.

तसेच 31 ऑगस्टनंतर अर्ज करणाऱ्या महिलांनाही लवकरच या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल, असे सांगितले जाते. त्यानंतर आता या योजनेअंतर्गत निधीवाटपाचा दुसरा टप्पा चालू करण्यात आला आहे. त्याची सुरुवात आता प्रत्यक्ष झाली आहे. अनेक महिलांच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये येण्यास सुरुवात झाली आहे. ज्या महिलांच्या बँक खात्यावर तीन हजार रुपये आलेले आहेत, ते पैसे माझी लाडकी बहीण योजनच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यासाठीचा लाभ आहे.

या महिलांना 4500 रुपये येणार –
दरम्यान, ज्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3000 रुपये मिळालेले नाहीत, त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे एकूण 4500 रुपये दिले जातील. पैसे खात्यात जमा होण्यासाठी महिलांचे बॅंक खाते हे आधार कार्डशी लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे. अनेक महिलांचे खाते आधारशी लिंक नसल्यामुळे त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होत नाहीत. आधार लिंक झाल्यास पैसे जमा होणार आहेत. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणेनुसार 30 सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. तसेच ही योजना अशीच पुढे सुरु राहणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी विविध ठिकाणी जाहीर सभांमध्ये सांगितले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महानगरपालिकेची कारवाई; पाच घर सील, दोघांचे नळ कनेक्शन तोडले

थकबाकीदारांनी शास्तीमाफीचा लाभ घेऊन तत्काळ कर भरावा व कारवाई टाळावी; आयुक्त यशवंत डांगे अहिल्यानगर ।...

संग्राम जगताप : ज्वलंत हिंदुत्वाचा भगवा अंगार

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अल्पसंख्याक समाजाच्या गठ्ठा मतांना फाट्यावर मारणारा अजित पवार यांच्या गटातील राज्यातील एकमेव...

आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यात ‘तो’ पॅटर्न; मंत्री दादा भुसे यांनी केले जाहीर

मुंबई | नगर सह्याद्री राज्यतील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडे (सीबीएसई) पालकांचा वाढत कल पाहून राज्य...

सत्तांतरामुळे बीडची पुनरावृत्ती नगरमध्ये टळली’; डॉ. सुजय विखे पाटील यांचा टोला

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दुर्दैवाने, मी राजकारणातील अभिनयगिरीत अपयशी ठरलो, पण प्रामाणिकपणे विकासकामे केली आणि...