spot_img
ब्रेकिंगLPG Cylinder Price: लोकसभा निवडणूक निकालापूर्वीच खुशखबर! एलपीजी 'सिलेंडर' झाले स्वस्त?...

LPG Cylinder Price: लोकसभा निवडणूक निकालापूर्वीच खुशखबर! एलपीजी ‘सिलेंडर’ झाले स्वस्त? पहा नवीन दर..

spot_img

LPG Cylinder Price: लोकसभा निवडणूक निकालापूर्वीच सरकारने खुशखबर दिली आहे. एलपीजी सिलिंडर स्वस्त झाला आहे. सलग तिसऱ्या महिन्यात गॅसचे दर घसरले आहेत. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी १ जून रोजी सिलिंडरच्या नव्या किंमती अपडेट्स केल्या आहेत. त्यात ही माहिती देण्यात आली आहे.

देशात लोकसभा निवडणुकीचा अंतीम टप्पा आज होत आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून रोजी येणार आहे. निवडणूक निकालापूर्वी चांगली बातमी आली आहे. 1 जून 2024 पासून देशभरात एलपीजी सिलेंडर सस्ता झाले आहेत. ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा मोठी कपात केली आहे.

IOCL च्या वेबसाइटनुसार, 19 किलोग्रॅमच्या एलपीजी सिलेंडरचे दर कमी केले आहे. एलपीजी सिलेंडरचे दर १ जून पासून नव्याने लागू केले आहे. आईल कंपन्यांनी हा बदल 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरबाबत केला आहे. 1 जूनपासून दिल्लीत 69.50 रुपये, कोलकातामध्ये 72 रुपये, मुंबईमध्ये 69.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 70.50 रुपये सिलेंडर स्वस्त झाले आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केला जातो. ते स्वस्त केल्यामुळे हॉटेल आणि बाहेरचे खाणे-पिणे स्वस्त होऊ शकते. परंतु घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.त घरगुती सिलेंडरची किंमत 803 रुपये आणि उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी 603 रुपये आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...