अहमदनगर | नगर सह्याद्री
नगर एमआयडीसी मधील कामगारांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी उद्योजकांनी बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. एमआयडीसी मधील कामगारांसाठी सिटी बस सेवा सुरू व्हावी यासाठी सुमित लोढा (Sumit Lodha) यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर तातडीने महापालिकेच्या माध्यमातून सिटी बस सेवा ( City bus Service) सुरू केली आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरच २० इलेट्रिक बस शहरांमध्ये धावणार असून केडगाव येथे बस डेपोचे काम सुरू होणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप
(MLA Sangram Jagtap) यांनी केले.
नगर एमआयडीसीतील श्री रेणुका माता मंदिर येथे अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने एमआयडीसीतील कामगारांसाठी सिटी बस सेवेचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी अमी संघटनेचे माजी अध्यक्ष राजेंद्र कटारिया, सुमित लोढा, माजी नगरसेवक सागर बोरुडे, जल अभियंता परिमल निकम, मिलिंद कुलकर्णी, शंतनू गाडे, संजय बंदिस्ती, दिलीप अकोलकर, सागर निंबाळकर, सचिन पाठक, सचिन काकड, दीपक नागरगोजे, श्री पानसरे, श्री सीक्रे, सुकी गुगळे, संतोष लांडे आदींसह नागरिक उपस्थित होते.
मागील २५ वर्षाचा विकासाचा बॅकलॉग भरत असताना प्राथमिक सुख सुविधा पासून काम करावे लागले आहे. या पुढील काळात एमआयडीसीमध्ये मोठ मोठे उद्योग आणण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. बस सेवेच्या माध्यमातून महिला भगिनीचा सुरक्षित प्रवास होणार आहे असे आ. जगताप म्हणाले.
उद्योजक मिलिंद कुलकर्णी म्हणाले की रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हीच सर्वात सुरक्षित आहे. कामगार वर्ग आपल्या कामावर येत असताना अपघाताच्या अनुचित घटना घडल्या आहेत.
त्यांच्या सुरक्षिततेसाठी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे सिटी बस सेवेची मागणी केल्यानंतर त्यांनी तातडीने एमआयडीसीतील उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावले आमदार संग्राम जगताप हे शहराला पुढे घेऊन जाणारे नेतृत्व मिळाले आहे. सर्वांना बरोबर घेऊन काम करत असल्यामुळे आपले शहर पुढे जात आहे कार्यक्रमाची प्रस्ताविक उद्योजक राजेंद्र कटारिया यांनी केले तर आभार प्रदर्शन उद्योजक सचिन पाटक यांनी मांडले. यावेळी माजी नगरसेवक डॉटर सागर बोरुडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आ. संग्राम जगताप आणि एमआयडीसीतील उद्योजकांनी सिटी बस सेवेतून प्रवास केला.