पारनेर । नगर सहयाद्री:-
पारनेर तालुक्यातील विविध राजकीय पक्षांतील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व यांच्या प्रमुख उपस्थितीत व आमदार काशिनाथ दाते सर यांचे नेतृत्वावर विश्वास दर्शवत मुंबईतील महिला विकास मंडळ सभागृहात हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
विशेष म्हणजे हे सर्व पक्ष प्रवेश आमदार काशिनाथ दाते सर यांच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले असून त्यांच्या संघटन क्षमतेचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे. त्यांच्या विधानसभेतील विजयानंतर पारनेर राष्ट्रवादीला अच्छे दिन आल्याचे पहावयास मिळत आहे. विविध गावच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील या प्रवेशामुळे तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट होणार असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हा पक्षप्रवेश निर्णायक ठरू शकतो.
यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख पंढरीनाथ उंडे, महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना उपाध्यक्ष धनंजयशेठ निमसे, युवसेना तालुकाप्रमुख सुभाष सासवडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश रोहकले, शिवसेना विभागप्रमुख देवराम मगर, माजी पंचायत समिती सदस्य प्रदीप वाळुंज, शिवसेना गणप्रमुख अक्षय गोरडे, शिवसेना शाखाप्रमुख करंजाळे संजय आहेर, शिवसेना माजी गटप्रमुख संतोष चौगुले, अविनाश गोडसे, माजी सरपंच पळसपुर महादेव पवार, शुभम गोडसे, विनोद गोडसे, प्रवीण डोंगरे, अनिल आहेर, प्रदीप वाफारे, नवनाथ आग्रे, प्रदीप चौधरी, अशोक वाळुंज, नवनाथ खरात, कान्हूर तर्फे पाडळी गावचे माजी सरपंच हरीश दावभट, युवसेना उपतालुकाप्रमुख ऋषिकेश नरसाळे, युवसेना उपतालुका प्रमुख शुभम टेकुडे, शिवसेना गणप्रमुख शरद गागरे, कामटवाडी गावचे सरपंच संतोष मोरे, पोखरी उपसरपंच परसराम शेलार, खादी ग्रामोद्योगचेअध्यक्ष आण्णासाहेब खैरे, तिखोल गावचे माजी सरपंच सुभाष ठाणगे, सरपंच गीताराम वाळुंज, चेअरमन बाळासाहेब रोकडे, अमोल रोकडे, धनंजय ढोकळे, भाऊसाहेब गागरे, दत्तात्रय फटांगरे, मिनिनाथ शिर्के, श्रीकांत वाघमारे, रामदास ढोले, राजेंद्र मुगदे, बाळासाहेब कोकाटे, संदीप केदार, एकनाथ दुधवडे, बाबासाहेब रोकडे, साहेबराव काशीद, संजय थोरात, अशोक खैरे, बाळशिराम शिंदे, निलेश बबन पवार, सोपान फरतारे, अविनाश शेलार, सोपान शेलार, सुमित रोहकले, नंदकुमार भांड, विक्रम मंचरे, बाळशिराम शिंदे, विकास शिवले आदींसह अनेक दिग्गजांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
अजित पवार यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. जात, धर्म, वंश न पाहता मेहनती कार्यकर्त्यांना संधी दिली जाते. त्यामुळे नवीन कार्यकर्त्यांनी संधीचं सोनं कराव शिव-शाहू-फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची वाटचाल सुरू आहे. सर्व समाज घटकांचा विकास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मिळून करायचा आहे. मी सर्वच पदाधिकारी-कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. राजकारण हे केवळ सत्तेसाठी नव्हे, तर समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी असावं, याच तत्त्वावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाम आहे.
या पक्षप्रवेश सोहळ्याला माजी खासदार आनंद परांजपे, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार अमोल मिटकरी, उद्योजक दिलीप दाते, जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, युवातालुकाध्यक्ष भास्कर शिरोळे यांच्यासह पक्षाचे अनेक मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आमदार काशिनाथ दाते सर यांचे जनसामान्य माणसांच्या प्रगतीला वेग देणारे काम युवावर्गाला आकर्षित करत असून माझा पक्षप्रवेश तालुक्यातील शेकडो सहकाऱ्यांच्या मताचा आदर करून घेतलेली भूमिका आहे. यापुढील काळात आमदार काशिनाथ दाते सरांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी पक्षाची विचारधारा तळागाळात पोहचविण्यासाठी दुप्पट वेगाने काम करणार.
सुभाष सासवडे, युवसेना तालुकाप्रमुख
शिवसेना पक्षात काम करताना अनेक अनुभव घेतले, पण विकासासाठी मर्यादा येत होत्या. अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आमदार काशिनाथ दाते सरांच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासात्मक वाटचालीसाठी ठोस निर्णय घेतले जातात आणि कामाला गती मिळते. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि टाकळी ढोकेश्वर गटाच्या प्रगतीसाठीच मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हा निर्णय वैयक्तिक लाभासाठी नसून जनतेच्या हितासाठी आहे.
पंढरीनाथ उंडे, शिवसेना उपतालुका प्रमुख
आमच्या पक्षात आलेल्या तालुक्यातील सर्वच नेत्यांचे मी मनापासून स्वागत करतो. त्यांच्या येण्याने पक्ष अधिक मजबूत होईल आणि स्थानिक पातळीवर विकासाला गती मिळेल. आज प्रवेश करणारी सर्वच नेतृत्व जनतेत कार्यक्षम आणि लोकप्रिय आहेत, त्यामुळे त्यांचा पक्षात प्रवेश हा आमच्यासाठी शक्तीवर्धक ठरेल. अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकसंघपणे काम करून तालुक्याच्या प्रगतीसाठी कटिबद्ध आहोत.
प्रशांत गायकवाड संचालक, जिल्हा बँक अहिल्यानगर