spot_img
अहमदनगरनगर-सोलापूर महामार्गवर सोनाराला लुटले; 'इतका' ऐवज लंपास

नगर-सोलापूर महामार्गवर सोनाराला लुटले; ‘इतका’ ऐवज लंपास

spot_img

अहमदनगर । सहयाद्री नगर
नगर- सोलापूर महामार्गवर सोनाराला धारधार शास्राचा धाक दाखवत १ लाख ५४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अंबादास रघुनाथ फुंदे ( रा. नारायणडोह, ता. जि. अहमदनगर) यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गुरुवार दि. २६ सप्टेंबर रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास फिर्यादी सराफ व्यावसाईक अंबादास रघुनाथ फुंदे दुचाकीवरून नगर- सोलापूर महामार्गवरून नगरकडे येत होते. दरम्यान तिन अनोळखी इसमांनी त्यांना आडवले.

धारधार शास्राचा धाक दाखवत त्यांच्याकडील ३८ हजार रुपये किमतीचे ९.५ ग्रॅम वजनाचे पाच नग सोन्याचे डोरले, १६ हजार रुपये किमतीचे ४ ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, १३ हजार रुपये किमतीचे ३ ग्रॅम वजनाचे दोन नग साखळी लटकण, २४ हजार रुपये किमतीचे ८ ग्रॅम वजनाची अंगठी, ४ हजार रुपये किमतीचे पायातील चांदीचे पैंजण, ६ हजार रुपये रोख रक्कम असा एकुण १ लाख ५४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी तीन अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आझाद ठुबे यांचा स्पेस कोण भरून काढणार?

जवळा जिल्हा परिषद गटात रस्सीखेच | सुजित झावरे, दीपक लंके, विश्वनाथ कोरडे, अशोक सावंत,...

मुंबईतील पक्ष बैठकीनंतर आमदार संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया

अहिल्यानगर | नगर सहयाद्री:- अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप...

एमआयडीसी परिसरात दिवसाढवळ्या दरोडा; महिलांनी फार्महाऊसमध्ये जबरदस्तीने प्रवेश केला, पुढे घडलं असं काही..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घाणेगाव शिवारात दिवसाढवळ्या एका फार्महाऊसवर घुसून,...

केडगावात विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला; नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- किरकोळ कारणावरून केडगाव परिसरात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर तिघा जणांनी...