spot_img
अहमदनगरलोणीतील सराफ दुकानात जबरी चोरी; कुख्यात गुंडाची टोळी 12 तासांत जेरबंद

लोणीतील सराफ दुकानात जबरी चोरी; कुख्यात गुंडाची टोळी 12 तासांत जेरबंद

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
लोणी येथील अजय ज्वेलर्स दुकानात झालेल्या जबरी चोरीचा गुन्हा केवळ 12 तासांत उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. कुख्यात गुंड बबन घावटे यांच्यासह अन्य दोन साथीदारांना अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार आहेत. पोलिसांनी कुख्यात गुंडाच्या टोळीकडून सोन्याचे नेकलेस, 5 मोबाईल, एक गावठी पिस्तुल, 2 जिवंत काडतुसे आणि चारचाकी वाहन असा एकूण पावणे आठ लाख रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीची नावे बबन भाऊसाहेब घावटे ( रा. राजापुर ता. श्रीगोंदा ), कृष्णा पोपट गायकवाड ( रा. हिंगणी, ता. श्रीगोंदा ) अशी आहे.

फिर्यादी राजेंद्र नागरे (वय 54) हे दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी साडेबारा वाजता आपल्या ज्वेलर्स दुकानात असताना ओळखीचा इसम बबन घावटे आणि त्याचे तीन साथीदार मारुती स्विफ्ट कारमधून दुकानात आले. फिर्यादीच्या चुलतभावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी पैशांची मागणी करत आरोपींनी पिस्तुलाचा धाक दाखवत कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपींनी काचेच्या ट्रेमधून 5 सोन्याचे नेकलेस जबरदस्तीने नेले असल्याचे फिर्यादीत नमूद केले होते.

घटनेचे गांभीर्य ओळखत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तपासाचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी तपासासाठी दोन पथक रवाना केले. तपासादरम्यान, पथकाला गुन्ह्यातील आरोपी बेलवंडी फाटा ते श्रीगोंदा रोडने चार चाकी वाहनाने येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा लावून गाडी अडवत आरोपीना अटक केली. बबन घावटे यास सदर गुन्ह्याबाबत विश्वासात घेवुन विचारपुस केली असता, त्यांने कृष्णा पोपट गायकवाड ( रा. हिंगणी, ता. श्रीगोंदा ), संकेत जाधव रा. गोलेगाव ता.शिरुर, जि.पुणे (फरार), करण खरात (रा. हिंगणीता श्रीगोंदा ) यांच्यासमवेत गुन्हा केल्याची कबुली दिली. मुख्य आरोपी बबन घावटे हा कुख्यात गुंड असून त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी अशा गंभीर स्वरूपाच्या १० गुन्ह्यांची नोंद आहे. पुढील तपास लोणी पोलीस करत आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मागदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षण किरणकुमार कबाडी यांच्या पथकातील पोउपनि/ संदिप मुरकुटे, अनंत सालगुडे पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे, गणेश लबडे, दिपक घाटकर, फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड, शाम जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, रमीझराजा आत्तार, बाळासाहेब गुंजाळ, सागर ससाणे, प्रशांत राठोड, मनोज साखरे, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत, चालक महादेव भांड, अर्जुन बडे यांच्या पथकाने केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठा निर्णय; ठरलेल्या वेळेतच धुरळा उडणार, पण… , कोर्ट काय म्हणाले

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रातील...

तपोवन परिसरातील बिबट्या जेरबंद; पहाटे चार वाजता पिंजऱ्यात अडकला

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगर शहराजवळील तपोवन परिसरात गेल्या काही दिवसांपासून वावर असलेला बिबट्या...

मामा भांजे कर्मचारी, फौज तो तेरी सारी है,..; सुजय विखे पाटीलांनी ऐन थंडीत संगमनेरचे राजकीय वातावरण गरम केले.

सुजय विखे पाटीलांचा बाळासाहेब थोरांतसह सत्यजित तांबेंवर थेट हल्ला संगमनेर । नगर सहयाद्री:- मामा भांजे...

राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; १२ जिल्ह्यांतील ३५ जागांवरील मतदान रद्द

१२ जिल्ह्यांतील ३५ जागांवरील मतदान रद्द; न्यायालयातील सुनावणी न झाल्याने कारवाई स्थगित मुंबई । नगर...