२० हजार हेक्टरवर पेरा | शेतकर्यांना वन्य प्राण्यांची डोकेदुखी
सुनिल चोभे | नगर सह्याद्री
तालुयात गुलाबी थंडी अन ठिकठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांनी चांगलीच उभारी घेतली आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने गहू, कांद्याचे क्षेत्र घटले असून, ज्वारीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. ज्वारी पिकांना मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने चांगलीच नवसंजीवनी मिळाली. तसेच बाजारातही ज्वारीला सोन्याचे भाव मिळत आहे. मात्र, ऐन बहारात आलेल्या ज्वारी पिकासाठी रानडुकरे कर्दनकाळ ठरत आहेत.
तालुयात सुमारे सहा हजार हेटर वनक्षेत्र आहे. मोठी निसर्गसंपदा लाभलेल्या क्षेत्रात वन्यप्राण्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात दिसून येते. हरीण, काळवीट, मोर, लांडगा, खोकड, कोल्हा, साळींदर हे वन्यप्राणी गर्भगिरीच्या टेकड्यांनी आढळून येतात. तालुयातील अनेक भागांत बिबट्यांचा देखील बावर आढळून येत आहे. परंतु, शेतकर्यांसाठी डोकेदुखी ठरणार्या रानडुकरांची संख्या सर्वांत अधिक आहे.
वन विभागाने केलेल्या पाहणीतून तालुयात सर्वाधिक संख्या रानडुकरांची असल्याचे स्पष्ट झाले आहे.रब्बी हंगामात सुमारे २० हजार हेटर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी करण्यात आलेली आहे. कांदा, गहू पिकांवर अवकाळी पाऊस व ढगाळ हवामानामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. त्यातच पाण्याचे संकट उभे ठाकण्याची शयता असल्याने कांदा, गहू पिके निघण्याची शाश्वती नाही. पाणीटंचाईचा धोका फळबागांनाही बसण्याची शयता आहे.
सद्यस्थितीत ज्वारी हे एकमेव पीक शेतकरी, तसेच जनावरांच्या चार्यासाठी फायदेशीर ठरणार असल्याचे चित्र आहे.जिरायत पट्ट्यातील ज्वारीने देखील अवकाळी पावसामुळे चांगलीच उभारी घेतली आहे. परंतु, रानडुकरांनी उच्छाद मांडला असून, मोठ्या प्रमाणात ज्वारी पिकांची नासाडी करण्यात येत आहे. रानडुकरांचे कळपच्या कळप ज्वारी पिकांवर डल्ला मारत आहेत. ज्वारीबरोबर इतर पिकांची देखील नासाडी सुरू आहे.
रानडुकरांकडून चारा पिके, मका पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात येत आहे.सलग दोन वर्षांपासून शेतकर्यांवर हवामानाची अवकृपा झाल्याचे दिसून येते. अतिवृष्टी, अवकाळी, गारपीट, ढगाळ हवामान, त्यातच चालू वर्षी पाणीटंचाई कवडीमोल भाव यामुळे त्रस्त असलेल्या शेतकर्यांसमोर रानडुकरांचे संकट उभे ठाकले आहे. रानडुकरांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.
शेतमालाला हमी भाव मिळण्याची गरज
कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकर्यांनी कमी पाण्यावरील पिकांकडे शेतर्यांचा कल होता. शेतकर्यांनी ज्यारी पिक निवडले. सध्या ज्वारीला सहा हजारांपेक्षा अधिक भाव मिळत असला तरी शेतकर्यांचे पिक बाजारात आले की शेतकर्यांच्या मालाला बाजार भाव मिळत नाही. कांद्याचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे शेतमालाला हमी भाव मिळण्याची गरज आहे, असे शेतकरी निलेश चोभे यांनी सांगितले.