spot_img
अहमदनगरसोन्याचे दागिने पश्चिम बंगालमधून जप्त; बंगाली कारागीरासह साथीदाराला अटक, वाचा अहिल्यानगर क्राईम

सोन्याचे दागिने पश्चिम बंगालमधून जप्त; बंगाली कारागीरासह साथीदाराला अटक, वाचा अहिल्यानगर क्राईम

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
नगर शहरातील गंजबाजार येथील सोन्याच्या दुकानातून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने पश्चिम बंगालमधून जप्त करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी ७१ ग्रॅम वजनाचे दागिने जप्त करत उर्वरित ऐवज मिळवण्यासाठी अधिक तपास सुरु केला आहे. दि. १६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १.१५ वाजता, फिर्यादी नमाजासाठी बाहेर पडले असताना, त्याच्या दुकानात काम करणाऱ्या बंगाली कारागीराने दुकानातील ९३ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरले होते. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अरमान अली कुरबान अली शेख (२० वर्षे, रा. हुगली, पश्चिम बंगाल) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोतवाली पोलिसांनी मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीद्वारे आरोपींचा मागोवा घेतला. तपासादरम्यान आरोपी अरमानने दागिने नझरुल नुर हुसैन व आसिफ खलील शेख या साथीदारांकडे दिल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी हे दागिने सराफ अब्दुलनसीम शेख याला विकले होते. पोलिसांनी पश्चिम बंगालच्या हुगली व वर्धमान जिल्ह्यात छापे टाकत स्थानिक पोलीस दलाच्या मदतीने चारही आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सुरु आहे.

किरण काळे विरोधात गुन्हा दाखल
कोतवाली पोलीस ठाण्यात पोलिसांना धक्काबुक्की व धमकी दिल्याच्या आरोपाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख किरण गुलाबराव काळे आणि नितीन गुलाबराव काळे (दोघे रा. भूतकरवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदरची घटना बुधवार दि. १७ सप्टेंबर रोजी पहाटे घडली. महेंद्र संतोष उपाध्याय (रा. केडगाव, अंबिकानगर) यांनी नितीन काळे याला मादक पदार्थांच्या अमलाखाली असल्याच्या संशयावरून कोतवाली ठाण्यात आणले. यावेळी नितीनने पो.कॉ. रामनाथ हंडाळ, पोना यु.ए. गायकवाड आणि मपोकॉ पूजा दिग्गत यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. दरम्यान, किरण काळे यांनी तुम्ही नोकरी कशी करता, पाहतो, असे म्हणत सरकारी कामात अडथळा आणला तसेच दोघांनी मोठ्याने आरडाओरड करून गोंधळ घातला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

लग्नाचे आमिष दाखवत विधवा महिलेवर अत्याचार
शहरातील एका विधवा महिलेला लग्नाचे खोटे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात ओमकार काशीनाथ मंडलिक (रा. कोठूळे मळा, मखमलाबाद रोड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेचा पतीचे २०१९ मध्ये निधन झाले होते. त्यानंतर दिल्लीगेट परिसरात ती आपल्या तीन वर्षांचा मुलांसोबत वास्तव्यास आहे. काही दिवसांपूर्वी तिची ओळख एका वेबसाइटवरून नाशिकमधील ओमकारशी झाली. ओमकारने आधार कार्ड पाठवून विश्वास संपादन केला. ओमकारने शहरातील एका हॉटेलमधील रूममध्ये ८ सप्टेंबरला लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर प्लॉट खरेदीसाठी ८५ हजार रुपयाची मागणी केली. पीडितेने मिनी गंठण गहाण ठेवत पैसे दिले. पीडितेला पांढरीपुल येथे नेले. पुन्हा अत्याचार केला. १४ सप्टेंबर रोजी पुन्हा माळीवाड्यातील एका लॉजिंगवर जबरदस्ती केली.तसेच काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच दारू पिऊन वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन करून शिवीगाळ व धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.

शस्त्राचा धाक दाखवत सोन्याचे दागिने व दुचाकी लंपास
शहरातील सिद्धांत पार्क परिसरात चार अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास घरात घुसून एका महिलेवर हल्ला करत सोन्याचे दागिने लुटले आणि घराबाहेर उभी असलेली मोटारसायकल घेऊन फरार झाले. या प्रकरणी दुर्गा भागवत सोनार (वय ३८, रा. लिंक रोड, सिद्धांत पार्कजवळ) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना मंगळवार दि. १६ सप्टेंबर रोजी पहाटे घडली. दोन चोरटे लोखंडी रॉड आणि गिलवर घेऊन त्यांच्या घरात घुसले, तर इतर दोन चोरटे बाहेर उभे होते. चोरट्यांनी दुर्गा यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्याकडील १६ ग्रॅम सोने जबरदस्तीने हिसकावून घेतले. विरोध केला असता चोरट्यांनी गिलवरने दगड फेकून हल्ला केला. त्यानंतर त्यांनी घराबाहेर ठेवलेली सुझुकी अ‍ॅडव्हेंचर दुचाकी देखील चोरली. चोरट्यांनी २ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घराभोवतीच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....

आमदारांची ॲक्शन, पोलिसांची रिॲक्शन; रस्त्यावर गोमांस फेकणाऱ्या आरोपीला सहा तासात बेड्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर...

गाडिलकर कुटुंबियांकडून शेकडो ठेवीदारांना गंडा?; सिस्पेविरोधात अन्नत्याग आंदोलन

पारनेर | नगर सह्याद्री तालुक्यातील वाघुंडे येथील विनोद गाडिलकर व विक्रम गाडिलकर कुटुंबीयांनी दामदुप्पट सह...

नुकसानीचे तातडीने पंचनामे करा: आ. काशिनाथ दाते, खडकवाडीत नुकसानग्रस्त पिकांची केली पाहणी..

पारनेर | नगर सह्याद्री तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसापासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे....