नाशिक । नगर सहयाद्री :-
नाशिक जिल्ह्याला पावसाने झोडपले असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. नार, पारसह अनेक नद्यांना पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटलाय. जनजीवन विस्कळीत झाले आहे. गोदावरी नदीसह नद्या आणि नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. गोदाकाठ खळाळला असून दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पोहोचले आहे.
गोदावरी नदीच्या काठावर असलेली मंदिरे आजही पाण्याखाली असून नदीचे पाणी अजूनही धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. गंगापूरसह नाशिकच्या परिसरातील जवळपास 12 धरणांतून सध्या पाण्याचा विसर्ग सुरु असून त्यामुळे गोदा नदीचा प्रवाह अधिकच वेगवान झाला आहे. नदीकाठच्या रहिवाशांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठी अनावश्यक गद टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गंगापूरसह जवळपास 12 धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्यावर पाणी आलेलं आहे. गोदावरी नदी आजही दुथडी भरून वाहत असल्यामुळे गोदा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.