अखंड मराठा समाजाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्या हत्तेचा कट समोर आला आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी अखंड मराठा समाजाच्यावतीने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती उघडकीस आल्याची माहिती समोर आलेली आहे. याप्रकरणी दोन संशयितांना जालना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. या कटाचा मुख्य सुत्रधार धनजंय मुंडे याला अटक करून, या प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी विशेष तपास पथक नेमून करण्यात यावी.
तसेच मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत संवेदनशील स्वरुपाचा असून जनतेमध्ये याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ झेड प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी. अशी मागणी अखंड मराठा समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या कडे करण्यात आली. यावेळी मदन आढाव, स्वप्निल दगडे, मिलींद जपे, परमेश्वर पाटील, अभिजीत निमसे, आमन तिवारी, विलास तळेकर, अशोक पवार, मिनाक्षी वागस्कर आदी उपस्थित होते.



