spot_img
अहमदनगरदूध उत्पादकांना १० रुपयांचे अनुदान द्या; माजी मंत्री शिवाजी कर्डिले नेमकं काय...

दूध उत्पादकांना १० रुपयांचे अनुदान द्या; माजी मंत्री शिवाजी कर्डिले नेमकं काय म्हणाले पहा

spot_img

जिल्हा दूध उत्पादक, डेअरी व प्लांट चालकांच्या बैठकीत मागणी
अहमदनगर । नगर सहयाद्री:-
दूध उत्पादक शेतकर्‍यांना सरसकट १० रुपयाचे अनुदान खात्यावर जमा करावे. तसेच जाचक अटी व केंद्र सरकारने घालून दिलेली अट रद्द करण्याची मागणी करणार असल्याची माहिती माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी डेअरी चालक व प्लांट धारकांच्या आयोजित बैठकीत दिली. या बैठकीला जिल्हाभरातील उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यातील दूध प्रश्नाबाबत मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे पाटील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला माजी मंत्री कर्डिले यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

दूध व्यवसाय हा शेतकर्‍यांचा जोडधंदा असून उदरनिर्वाह करण्याचे साधन आहे. मात्र दूध भावासंदर्भात शेतकरी सरकारवर नाराज आहे. सरकारने पाच टक्के अनुदान जानेवारी महिन्यातच जाहीर केले होते; मात्र जाचक अटी शर्तीमुळे ते शेतकर्‍यांपर्यंत पोहचू शकले नाही. फक्त ४० टक्केच दूध उत्पादकांना लाभ झाला आहे. उर्वरित ६० टक़्के शेतकर्‍यांपर्यंत ही योजना पोहोचलीच नाही. मंत्रालय स्तरावर सरकार निर्णय घेत असताना ग्रामीण भागातील प्रश्न समजून घेण्याची खरी गरज आहे, मात्र अधिकारी वर्ग मंत्रालयात बसूनच निर्णय घेत असतात.

त्यामुळे सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाच्या योजना पोहोचत नाहीत. त्यामुळे सरकारवर नागरिकांचा रोष निर्माण होत असतो. दोन लिटर दूध उत्पादकापासून तर थेट १०० लिटर दूध उत्पादकापर्यंत सर्वांनाच शासनाच्या अनुदानाची मदत होणे गरजेचे आहे. मुंबईत होणार्‍या दूध प्रश्नाबाबतच्या बैठकीत सविस्तर बाजू मांडली जाईल आणि दूध उत्पादकांना न्याय दिला जाईल असे त्यांनी सांगितले. यावेळी दूध उत्पादक शेतकरी, डेअरी चालक व प्लांट चालकांनी आपल्या समस्या मांडल्या.

दूध उत्पादक शेतकर्‍यांचा रोष भाजपला महागात पडला
केंद्र व राज्य सरकार शेतकरी, सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी विविध योजना तयार करून निर्णय घेत असते; मात्र त्याची अंमलबजावणी वेळेवर होत नाही. आता राज्य सरकारने राज्यातील दिंड्यांना २० हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली. मात्र अजूनपर्यंत अधिकारीवर्गाने जीआर काढला नाही. लोकसभा निवडणुकीत दूध उत्पादक शेतकर्‍यांचा रोष भाजपला महागात पडला आहे असे मत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केले. राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकर्‍यांना पाच रुपयांचे अनुदान मंजूर केले; मात्र त्याच्या जाचक अटीशर्तीमुळे कागदपत्रे जमा करताना दमछाक होते. बहुतांश शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घेतला नाही. त्यामुळे सरकार बद्दल ग्रामीण भागात मोठा रोष निर्माण झाला अशा भावना शेतकर्‍यांनी व्यक्त केल्या.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सामान्यांचा आधारवड: आमदार अरुणकाका जगताप

अहिल्यानगर-  अरुणकाका आमदार अरुणकाका म्हणजे सामान्य जनतेचा आधारवड. गरिबांवरील अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा, गरीब आणि...

हवामान खात्याचा इशारा आला! नगर जिल्ह्याला ‘इतक्या’ दिवसाचा यलो अलर्ट

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा अजूनही कायम असून, हवामान विभागाने पुढील...

निष्ठावंतांचं केडर जपणारे काका पुन्हा होणे नाही!

काका म्हणाले होते, ‌‘जनतेचे आशीर्वाद अन्‌‍ प्रेम मला मिळाले, सचिन आणि संग्रामला माझ्या दुप्पट...

भारतीय सैन्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला; वाचा, स्पेशल रिपोर्ट

कर्नल सोफिया कुरेशी | पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी...