spot_img
अहमदनगरआ. संग्राम जगताप यांना मंत्रीपदाची संधी द्या; कोणी केली मागणी पहा...

आ. संग्राम जगताप यांना मंत्रीपदाची संधी द्या; कोणी केली मागणी पहा…

spot_img

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महिला आघाडीची मागणी
अहिल्यानगर / नगर सह्याद्री
राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी राज्यात रिक्त अलेल्या मंत्रीपदी अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांना संधी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अशा निंबाळकर यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंढे यांच्या राजीनाम्या नंतर राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोट्यातील एक मंत्रिपदसध्या रिक्त आहे. या रिक्त मंत्रीपदी आ.संग्राम जगताप यांची वर्णी लावण्याची मागणी आशा निंबाळकर यांनी केली आहे. आ.संग्राम जगताप यांना जर मंत्रीपद दिलेतर ते पूर्ण राज्यात आदर्शवत काम करून पक्षाचाही नावलौकिक वाढवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या मागणीस उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत प्रतिसाद दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महिला आघाडीची नूतन कार्यकारिणीची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अशा निंबाळकर यांनी अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत रविवारी जाहीर केली. यावेळी आ.जगताप यांच्या हस्ते सर्व नव्याने नियुक्त झालेल्या महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करतना निंबाळकर यांनी ही मागणी केली. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यालयीन सचिव साईनाथ भगत, माजी उपमहापौर दीपक सूळ, अरुणा गोयल आदींसह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

आ.संग्राम जगताप म्हणाले, आशा निंबाळकर या दांडग्या अनुभवी असल्याने त्यांच्याकडे चांगले संघटन कौशल्य आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यात चांगले काम वाढवले आहे. प्रामुख्याने महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी कायम पुढाकार घेत त्यांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. महिलांना आधार देण्याचे चांगले काम त्यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नूतन महिला पदाधिकाऱ्यांनी पक्ष वाढीसाठी योगदान देऊन राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचे हात बळकट करावेत, असे आवाहन केले.

अशा निंबाळकर म्हणाल्या, आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर शहर व जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ताकद वाढली असून जोरदार घौडदौड सुरु आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त महिला सदस्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत. तळागाळापर्यंत पक्ष पोहोचला असल्याने जिल्ह्यात संघटन बळकट होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सर्व महिलांना राज्य व केंद्र सरकारच्या सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत आहोत.

संपत बारस्कर म्हणाले, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आशा निंबाळकर यांचे काम खूप मोठे आहे. महिलांना सर्व शासकीय योजनांचा लाभ त्या मिळवून देत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात काम करण्यासाठी महिलांना खूप संधी आहेत. याचा लाभ महिलांनी घ्यावा. राज्यातील सर्व लाडक्या बहिणींमुळेच राज्यात महायुतीचे सरकार आले आहे. त्यामुळे महिलांसाठी हे सरकार खूप काही करत आहे.

यावेळी जाहीर करण्यात आलेली राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा महिला आघाडीची नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – जिल्हाध्यक्ष आशा निंबाळकर, जिल्हा उपाध्यक्षा सुजाता कदम, स्मिता वाल्हेकर व संगीता ससे. नगर तालुका उपाध्यक्षा स्नेहल दरंदले, सरचिटणीस वनिता ठोंबे, जिल्हा सरचिटणीस कल्याणी गाडळकर, सरचिटणीस रोहिणी दळवी, कोषाध्यक्षा आश्विनी दळवी, सरचिटणीस स्वाती पवार, सरचिटणीस रुपाली तांबोळी, सचिव अश्विनी झरेकर, उपतालुका प्रमुख टिना लालबेग, जिल्हा चिटणीस अंबिका भिसे, सहसचिव दिपाली आढाव, सहसचिव भारती दिवटे. आदींना यावेळी आ.जगताप यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हात, पाय, मुंडके तोडलेल्या मृतदेहाचे रहस्य उलगडले

माउली गव्हाणे खून झालेल्या व्यक्तीचे नाव | सागर गव्हाणे आरोपी श्रीगोंदा | नगर सह्याद्री -  श्रीगोंदा...

शिवजयंती धूमधडाक्यात साजरी  

अहिल्यानगर | नगर सह्याद्री हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती सोमवारी नगर शहरात...

कर्मवीर अण्णा, ‘रयत’चे काही शिक्षक का झालेत सैराट?; नगरच्या ‘या’ शाळेत तब्बल सात शिक्षक निघाले सैराट…

पवार साहेब, आवरा तुमच्या जनरल बॉडी सदस्यांसह पदाधिकार्‍यांना / पठार भागातील पालकांनी मुली शाळेत...

लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांची मोठी घोषणा; म्हणाले “योजना बंद करणार नाही, पण…”

मुंबई / नगर सह्याद्री : लाडकी बहिण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. या योजनेअंतर्गत दर...