spot_img
ब्रेकिंगव्याजाच्या बदल्यात शरीरसुख दे! सावकाराने केलं महिलेला ब्लॅकमेल, शहरात नक्की काय घडलं?

व्याजाच्या बदल्यात शरीरसुख दे! सावकाराने केलं महिलेला ब्लॅकमेल, शहरात नक्की काय घडलं?

spot_img

crime News: व्याजाने पैसे देऊन व्याजाच्या मोबदल्यात शरीरसुखाची मागणी करत महिलेला ब्लॅकमेल करून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. रामा विठ्ठल जानकर (वय-४६, रा. शिवप्रसाद कॉलनी, कदमवाडी, कोल्हापूर) या आरोपीला अटक केली आहे.

सावकार जानकरने सुरुवातीला तिला ७० हजार रुपये १० टक्के व्याजाने दिले होते. मात्र, व्याजाच्या पैशांसाठी तगादा लावत त्याने महिलेची असहाय्यता पाहून तिच्यावर जबरदस्ती केली. दारू पाजून बेशुद्ध अवस्थेत तिचे छायाचित्र आणि व्हिडिओ तयार करून ते नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देत त्याने तिला अनेकदा अत्याचार सहन करण्यास भाग पाडले.

जानकरने व्याजाच्या पैशांसाठी तिचे राहते घरही तीन लाख रुपयांत बळजबरीने नावावर करून घेतले. त्यानंतरही व्याजाच्या मोबदल्यात शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडत राहिला. त्याच्या सततच्या धमक्या आणि जबरदस्तीमुळे पीडित महिलेने शेवटी पोलिसांकडे धाव घेतली.जानकर हा कोणत्याही शासकीय दफ्तरी अधिकृत सावकार नसून तो अनधिकृतपणे व्याजाने पैसे देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदरची घटना कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेर राजकीय कुस्त्या लावण्यासाठी माहीर ; डॉ. सुजय विखे पाटील नेमकं काय म्हणाले पहा…

  बाबासाहेब तांबे सोशल फाउंडेशनच्या आखाड्याचा जिल्ह्यात नावलौकिक पारनेर | नगर सह्याद्री अंबिका माता यात्रा उत्सवा निमित्ताने...

रंजित कासले प्रकरणात मोठं ट्विस्ट; ‘त्या’ 10 लाख रुपयांबाबत धक्कादायक खुलासा, अडचणीत वाढ

बीड / नगर सह्याद्री मोठी बातमी समोर येत आहे, निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले...

पावसाचा पहिला अंदाज आला! राज्यात ‘या’ तारखेला कोसळणार?

Weather Update: -भारतीय हवामान विभागाने २०२५ च्या मान्सून २०२५ च्या हंगामासाठीचा आपला अंदाज जाहीर...

‘राष्ट्रवादीचे सभासद नोंदणीतून बळ वाढणार’; टाकळी ढोकेश्वर गटातून अभियानाला सुरुवात

पारनेर | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाला पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा...