spot_img
अहमदनगरराखी पोर्णिमेला लाडक्या बहिणींना मिळणार गिफ्ट? ४४ लाख बहिणींची झाली नोंद

राखी पोर्णिमेला लाडक्या बहिणींना मिळणार गिफ्ट? ४४ लाख बहिणींची झाली नोंद

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री

महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना सुरु करण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर राज्यात ठिकठिकाणी महिलांच्या रांगा लागल्या आहेत. अर्थमंत्री अजित पवार यांनी येत्या राखी पौर्णिमेला महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ पोहचणार असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी २.५ कोटी लाभार्थीचा डाटा कसा भरणार? हा मोठा प्रश्न होता. यासंदर्भातील सर्व्हर वारंवार ठप्प होण्याचे प्रकार घडत आहे. यामुळे आजपासून (१५ जुलै) शासनाने नवीन पद्धत तयार केली आहे. यूआरएल पद्धतीने महिलांची खाती उघडली जाणार आहे.

यूआरएल म्हणजे युनिक रिसोर्स लोकेटर प्रणाली आहे. ज्या प्रमाणे आयकरदाते यूआरएलवर स्वत:चे खाते हाताळतात. त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला आपले खाते हाताळू शकणार आहे. राज्यभरातील महिलांना आपला संपूर्ण तपशील यूआरएल खात्यात भरता येणार आहे. यामुळे सर्व्हर ठप्प होण्याच्या तांत्रिक अडचणीवर पर्याय तयार होणार आहे.

लाडकी बहीण अ‍ॅपवर राज्यातील ४४ लाख बहिणींची नोंद आतापर्यंत झाली आहे. तसेच १० लाख अर्जांची आवेदने खात्यापर्यंत पोचली आहेत. लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या महिलांना जुलैपासून १५०० रुपये देण्यात येणार आहे. त्यांच्या खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात येणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सामान्यांचा आधारवड: आमदार अरुणकाका जगताप

अहिल्यानगर-  अरुणकाका आमदार अरुणकाका म्हणजे सामान्य जनतेचा आधारवड. गरिबांवरील अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा, गरीब आणि...

हवामान खात्याचा इशारा आला! नगर जिल्ह्याला ‘इतक्या’ दिवसाचा यलो अलर्ट

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा अजूनही कायम असून, हवामान विभागाने पुढील...

निष्ठावंतांचं केडर जपणारे काका पुन्हा होणे नाही!

काका म्हणाले होते, ‌‘जनतेचे आशीर्वाद अन्‌‍ प्रेम मला मिळाले, सचिन आणि संग्रामला माझ्या दुप्पट...

भारतीय सैन्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला; वाचा, स्पेशल रिपोर्ट

कर्नल सोफिया कुरेशी | पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी...