spot_img
अहमदनगर'जायंट किलर' होम पिचवर' क्लीनबोल्ड'; सुजय विखेंनी घेतला पराभवाचा बदला

‘जायंट किलर’ होम पिचवर’ क्लीनबोल्ड’; सुजय विखेंनी घेतला पराभवाचा बदला

spot_img

पारनेर विधानसभा मतदारसंघात काशिनाथ दाते विजयी
पारनेर । नगर सहयाद्री:-
नगर दक्षिण लोकसभा मतदार संघामध्ये सुजय विखे यांचा पराभव करून जिल्ह्यात नव्हे तर राज्यात जायंट किलर ठरलेले नीलेश लंके हे विधानसभा निवडणुकीमध्ये होम पिचवरच क्लीनबोल्ड झाले आहेत. माजी खासदार सुजय विखे यांनी लोकसभेला झालेल्या त्यांच्या पराभवाचा वाचपा पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात काशिनाथ दाते सर यांना आमदार करून घेतला आहे.

पारनेर नगर विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार काशिनाथ दाते यांनी आश्चर्यकारकरीत्या विजय मिळवला असून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार राणी लंके यांचा दीड हजार मतांनी पराभव केला. खा. नीलेश लंके यांच्यासाठी धक्कादायक पराभव मानला जात आहे.

या मतदारसंघात खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या. महायुतीकडून काशिनाथ दाते हे उमेदवार होते. सुरुवातीला लंके यांचे पारडे जड होते मात्र दाते यांनी या मतदारसंघांमध्ये काट्याची टक्कर देत बाजी मारली. अतितटीच्या लढतीत लंके यांचा या मतदारसंघांमध्ये १५२६ मताने धक्कादायक पराभव झाला. लंके यांची सुरुवातीपासून मतदारसंघावर पकड होती. मात्र घराणेशाही, लाडकी बहीण योजना फॅक्टरमुळे त्यांची पीछेहाट झाली असल्याचे बोलले जात आहे. सुरुवातीला असणारी पकड़ शेवटपर्यंत त्यांना टिकवता आली नाही.

लागलेल्या निकालावरून असे दिसते की नीलेश लंके यांना त्यांचा अति आत्मविश्वास नडला. त्यामुळेच निवडणुकीमध्ये मतदारांनी त्यांना स्वीकारले नाही. मतदार संघातील नगर भागातील गावांमधून दाते यांना निर्णायक आघाडी मिळाली. तिथेच त्यांचा विजय निश्चित झाला. पारनेर तालुक्यात देखील निघोज, टाकळी ढोकेश्वर, ढवळपुरी या गटामध्ये देखील लंके यांना मतदान कमी पडले. पारनेर शहरामध्ये दाते यांना अपेक्षेपेक्षा मताधिक्य मिळाले, विजय दृष्टीपथात येताच राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनी फटाके वाजवत गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला.

पारनेर शहरातून विक्रमी समुदायासह विजयी मिरवणूक काढत नीलेश लंके यांच्या विरोधात मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. पारनेर बाजारतळ येथे जाहीर विजयी सभा घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्षा संध्याताई सोनवणे, सुजित झावरे पाटील, माजी नगराध्यक्ष विजय औटी, सचिन वराळ पाटील, राहुल शिंदे पाटील, विश्वनाथ कोरडे, अशोक सावंत, प्रशांत गायकवाड, माजी सभापती गणेश शेळके, मा. जि. प. सदस्य वसंत चेडे, डॉ. भाऊसाहेब खिलारी, लाडकी बहीण योजना समितीचे तालुकाध्यक्ष सुनील थोरात, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर, नगरसेवक पै. युवराज पठारे, दादाभाऊ चितळकर, अरुण होळकर, संदीप कपाळे, सरपंच पंकज करखिले, मा. शिवाजी खिलारी, सरपंच मनोज मुंगसे, सरपंच लहू भालेकर, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा सुषमा रावडे, राजेंद्र उबाळे, आदी उपस्थित होते.

४० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीच्या मेहनतीला यश
पारनेर विधानसभा मतदारसंघातील विजय सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आहे. जनतेचा व माझ्यावर विश्वास टाकलेल्या नेतृत्वाचा हा विजय आहे. अत्यंत कमी कालावधी मिळाला असतानाही आमच्या महायुतीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत व कष्ट करून विजय खेचून आणला आहे. ही निश्चितच माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. त्यामुळे माझ्या ४० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीच्या मेहनतीला यश मिळाले.
– काशिनाथ दाते ( विजयी उमेदवार, नगर पारनेर मतदासंघ )

सुजित झावरे ठरले किंगमेकर
खासदार नीलेश लंके यांना घरचा रस्ता दाखवत पारनेर मतदार संघात काशिनाथ दाते विजयी झाले. आक्रमक असलेल्या खा. निलेश लंकेच्या विरोधात काशिनाथ दाते व सुजित झावरे यांनी योग्य टायमिंग साधत व शांत डोक्याने विजय खेचून आणला या संपूर्ण निवडणुकीत सुजित झावरे यांनी शांत भूमिका घेऊन दाते सरांसाठी योग्य अशी फिल्डिंग लावली होती. त्यामुळे विजय आणखीन सुकर झाला. पारनेर मध्ये दाते सरांच्या विजयात सुजित झावरे हे किंगमेकर ठरले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

“…म्हणजे हा सुनियोजित कट”; आ. राम शिंदे यांच्या दाव्याने महायुतीत नवा ट्वीस्ट!

अहिल्यानगर | नगर सह्याद्री- मी नियोजित कटाचा बळी ठरलो, असा आरोप करत राम शिंदेंनी थेट...

कामगार हादरले! MIDC मधील कंपनीत मोठा स्फोट; प्लँट ऑपरेटर..

Maharashtra News Today: एका रासायनिक कंपनीमध्ये स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंबरनाथ...

मी पुन्हा येईन! महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच? १३७ आमदारांचा पाठिंबा, दिल्लीत महत्त्वाची बैठक

मुंबई । नगर सहयाद्री:- विधानसभा निवडणुकीचे निकाल आता हाती लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा...

बळीराजासाठी जुगाड! पाठीवर भलं मोठं ओझं घेऊन फवारणी करण्यापेक्षा वापरा ‘ती’ ट्रिक्स..

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- पाठीवर भलं मोठं ओझं घेऊन फवारणी करण्यापेक्षा ड्रोनच्या माध्यमातून फवारणी...