spot_img
ब्रेकिंगराज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवी मंदिरात घटस्थापना उत्साहात

राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवी मंदिरात घटस्थापना उत्साहात

spot_img

निघोज | नगर सह्याद्री
राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीची घटस्थापना विधिवत पूजा करीत उत्साहात पार पडली. यावेळी पोपट महाराज देशपांडे यांनी देवीची विधिवत पूजा केली. देवीचे पुजारी विकास गायखे व त्यांच्या कुटुंबातील महिलांनी देवीचे औक्षण करीत घटस्थापना केली.

यंदा पाऊसपाणी भरपूर झाल्याने तसेच शेतीला आर्थिक समृद्धीचे दिवस असल्याने सर्वत्र नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. मळगंगा देवीच्या दर्शनासाठी राज्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक नवरात्र उत्सवात येत असतात. पहाटे तीन ते पाच देवीची महापूजा झाल्यानंतर महाआरती होऊन दिवसभर दर्शनासाठी रांगा लागतात.

सायंकाळी सात वाजता पुन्हा महाआरती होत असते. देवीच्या पूजेचा मान गायखे कुटुंबाला असून महाआरतीसाठी संबळाचा मान दुणगुले कुटुंबाला आहे. मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, निघोज ग्रामस्थ व मुंबईकर मंडळ तसेच ग्रुप ग्रामपंचायत व मळगंगा यात्रा उत्सव समिती नवरात्र उत्सव यासाठी नियोजन करीत असतात. दहाव्या दिवशी होमहवन, त्यानंतर विजयादशमीदिनी मळगंगा देवीचा पालखी सोहळा होतो.

जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरातील मळगंगा देवीच्या मंदिरात घटस्थापना करण्यात आली. गावातील व कुंडावरील मंदिरांत नवरात्र उत्सवात चोवीस तास समया तेवत राहतात. यासाठी हजारो महिला भाविक या समयांना तेल देत असतात. मंदिरापुढील नंदादीप तेवत ठेवतात. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कुंड माउली नवरात्र उत्सव मंडळाने प्रवचन व किर्तनाचे आयोजन केले आहे.

तसेच सुंदर गाण्यांचा कार्यक्रम ठेवला असून महाप्रसाद म्हणून सााबुदाणा खिचडी देण्यात येणार आहे. निघोज येथे मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, निघोज ग्रामस्थ व मुंबईकर मंडळ यांनी आठ दिवस भजन संध्या, दांडिया रास, मळगंगा आईचा जागर, खेळ पैठणीचा अशाप्रकारे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांसाठी भावीक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर दक्षिण जिल्ह्याला झोडपले; नद्यांना पूर, पिके पाण्यात

पाथर्डी, जामखेड, नगर, श्रीगोंदा, कर्जतमध्ये तुफान पाऊस अहिल्यानगर | नगर सह्याद्री गेल्या आठ दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात...

अबब… थेट पोलिस निरीक्षकालाच मागीतली दोन कोटींची खंडणी! अहिल्यानगर पोलीस दलात मोठी खळबळ

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जुहू (मुंबई) येथे मेहुण्याच्या हॉटेलमध्ये रिसेप्शनीस्ट आणि पुढे व्यवस्थापक म्हणून काम...

शहरात खळबळ! खासदार ओवेसी यांच्या सभेला विरोध करणाऱ्या वकिलास जीवे मारण्याची धमकी, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेस विरोध करणाऱ्या वकिलास जीवे मारण्याची...

समाजकंटकांचा बाधा आणण्याचा प्रयत्न; ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण, मोठा फौजफाट्यासह रॅपीड ॲक्शन फोर्सची तुकडी दाखल, नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील ग्रामदैवत पूर्वमुखी हनुमान मंदिरात मूतच्या चौथऱ्यावर...