spot_img
मनोरंजनघनःश्याम दराडेंची बिग बॉसच्या घरातून 'Exit'; 'हा' स्पर्धक बिग बॉसच्या घरात राडा...

घनःश्याम दराडेंची बिग बॉसच्या घरातून ‘Exit’; ‘हा’ स्पर्धक बिग बॉसच्या घरात राडा घालायला सज्ज!

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री:-
बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये दरदिवशी नवीन टास्क आणि राडे बघायला मिळतात. बिग बॉसमध्ये या आठवड्यात गणपती स्पेशल भाऊचा धक्का सुरु आहे. आज रविवारी (8 सप्टेंबर) बिग बॉसच्या घरातून एक सदस्य बाहेर जाणार आहे. सर्वांचा लाडका घन:श्याम दराडेंची exit झाली आहे. आजच्या भाऊच्या धक्क्यावर छोट्या पुढारीचा बिग बॉसचा प्रवास संपणार आहे.

बिग बॉसच्या घरात घन:श्याम दरवडे, निक्की तांबोळी, आर्या जाधव, अभिजित सावंत, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, अरबाज पटेल यांचा सावेश होता. यापैकी धनंजय पोवार, अभिजित सावंत यासारखे स्पर्धक अनेकवेळा नॉमिनेट झाले आहेत. पण प्रेक्षकांनी भरभरून वोट दिल्यामुळे ते स्पर्धेत अद्याप कायम टिकून आहेत.

यावेळीच्या एलिमिनेशनमध्ये कोणाचा नंबर येणार, याची सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र यावेळीदेखील आर्या, धनंजय, अभिजित आणि सुरज चव्हाण पुन्हा एकदा वाचले आहेत. या आठवड्यात घन:श्याम दरवडे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडत आहे.

अशातच आज बिग बॉसमध्ये या सीझनमधील पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. त्यामुळे सर्वांची उत्सुकता शिगेला आहे. या वाइल्ड कार्ड एन्ट्रीचा प्रोमो रिलीज झाला असून प्रेक्षकांनी घरात कोण जाणार याबद्दल अचूक अंदाज लावलेला दिसतोय.

हा स्पर्धक बिग बॉसमधील पहिला वाइल्ड कार्ड?
‘तेरा बाप आया’ या गाण्यावर पिळदार शरीरयष्टीचा एक स्पर्धक बिग बॉसच्या घरात राडा घालायला सज्ज आहे. त्याविषयीचा प्रोमो रिलीज झाला आहे. दिलदार, मनाचा राजा आणि रांगडा गडी असं वर्णन करत या प्रोमोत वाइल्ड कार्ड स्पर्धक पाठमोरा दिसतोय. प्रेक्षकांनी कमेंट करुन हा स्पर्धक दुसरा तिसरा कोणी नसून तो संग्राम चौगुले आहे, हे ओळखलंय. इतकंच नव्हे तर संग्राम चौगुलेची पत्नी स्नेहल यांनी हा प्रोमो शेअर केला असून संग्राम घरात जाणार यावर शिक्कामोर्तब केलंय.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...