अहिल्यानगर | नगर सह्याद्री
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश पदाधिकार्यांनी माझ्यावर जो विश्वास व्यक्त करत शहर जिल्हाध्यक्षपदी केलेली नियुक्ती सार्थ ठरवत शहरात पक्ष संघटन अधिक मजबूत करणार आहे. शहरात पक्षाच्या बळकटीसाठी जुन्या-नव्या पदाधिकार्यांची सांगड घालून शहराची भक्कम बूथरचना करत आहे. आगामी महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीने लढून मनपावर भाजपचाच झेंडा फडकविण्यासाठी कटिबद्ध होत तयारीला लागा, असे आवाहन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी पदाधिकार्यांना केले.
भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग ११ व १२ मधील पदाधिकार्यांच्या वतीने तसेच प्रदेश सचिव गीता गिल्डा परिवाराच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अनिल मोहिते बोलत होते. या कार्यक्रमास सावेडी मंडल अध्यक्ष सीए ज्ञानेश्वर काळे, केडगाव मंडल अध्यक्ष भरत ठुबे, भिंगार मंडल अध्यक्ष सचिन जाधव, मध्य मंडल अध्यक्ष मयूर बोचूघोळ यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रास्ताविकात गीता गिल्डा यांनी पक्षश्रेष्ठींनी शहर जिल्हाध्यक्ष व मंडल अध्यक्षपदी योग्य व्यक्तींची निवड केल्याचे म्हटले. या सर्व नव्या पदाधिकार्यांचे हात बळकट करणे आपले कतर्र्व्य आहे. शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते हे जुने कार्यकर्ते असून पूर्वीपासून संघ कार्यात सक्रिय आहेत. इतके दिवस ते बॅक स्टेजला असायचे. त्यामुळे प्रसिद्धी व चर्चेत आले नाहीत. मात्र ते अनुभवी असून त्यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा नक्कीच फडकणार, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते गोकुळ काळे, राहुल जामगावकर, संतोष गांधी, अनिल निकम, ज्ञानेश्वर काळे आदींनी मनोगत व्यक्त केले. बैठकीचे सूत्रसंचालन डॉ दर्शन करमरकर यांनी केले. यावेळी महेश नामदे, प्रिया जानवे, वंदना पंडित, आरती होशिंग, नीता फाटक, रेणुका कार्नदीकर, नीता देवराईकर, सुरेखा जंगम, कालिंदी केसकर, लीला अगरवाल, राखी आहेर, सोनाली चितळे, ज्योती दांडगे, सविता कोटा, श्वेता झोंड, बाळासाहेब भुजबळ, सुनील तावरे, दीपक देहेरेकर, प्रमोद बुर्हाडे, ज्ञानेश्वर धिरडे, अजित कोतकर, शुभम लोंढे, संध्या पावसे, विद्या कुलकर्णी, अर्चना बनकर, रेखा मैड, अमोल निस्ताने, लक्ष्मिकांत तिवारी, मंगेश खंगले आदी पदाधिकारी उपस्थित होते.