spot_img
अहमदनगरसोन्याचे बिस्कीट घ्या, त्याचा बदल्यात...: माळीवाडा परिसरात महिलेसोबत घडलं असं काही..

सोन्याचे बिस्कीट घ्या, त्याचा बदल्यात…: माळीवाडा परिसरात महिलेसोबत घडलं असं काही..

spot_img

महिलांची फसवणूक करून दागिने चोरणारा जेरबंद
कोतवाली पोलिसांची कारवाई
अहमदनगर । नगर सहयाद्री
महिलांना बतावणी करुन सोन्याची चैन व मंगळसुत्र काढून त्यांना बनावट सोन्याचे बिस्कीट देऊन फसवणूक करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. संतोष मोहनराव चिंतामणी (रा राजगुरुनगर, पेठ. जि.बीड ) असे आरोपीचे नाव आहे.

दि. २७ ऑगस्ट रोजी सुमन केशव खोजे (रा धनगर गल्ली, भिंगार अहमदनगर) यांनी माळीवाडा बस स्थानक परिसरात एका इसमाचे सोन्याचे बिस्कीट तुम्हाला देतो, त्याचा बदल्यात तुमची सोन्याची चैन द्या असे सांगुन पिवळ्या धातुचा तुकडा देवुन फसवणुक केली असल्याची फिर्यादी दिली होती. त्याच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हा प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुन्हे शोध पथकाला तात्काळ तपास सुरू करण्याच्या सुचना दिल्या. गुन्हे शोध पथकाने फिर्यादी कडे सखोल चौकशी करुन आरोपीच्या वर्णनाची माहिती घेतली. दरम्यान अंगात पांढरा शर्ट, काळे रंगाची पँन्ट तसेच पायात चप्पल डोक्यात टोपी घातलेला इसम नगर कॉलेज रोडने पायी चालत असल्याची माहीती मिळाली.

प्राप्त माहितीनीसार गुन्हे शोध पथकाने चांदणी चौक परिसरातून आरोपीला ताब्यात घेतले. तपासादरम्यान, आरोपीने यापूर्वी माळीवाडा येथील आणखी एका महिलेची फसवणूक केली असल्याची कबुली दिली असून, त्याचेकडून पावणे दोन तोळे सोन्याची साखळी हस्तगत करण्यात आली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, गुन्हे शोध पथकाचे पोसई महेश शिंदे,पोहेकाँ योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, विशाल दळवी, विक्रम वाघमारे, सुर्यकांत डाके, सलीम शेख, दशरथ थोरात,संभाजी कोतकर पोना अविनाश वाघचौरे, अभय कदम, अमोल गाढे,सतिश शिंदे,अतुल काजळे, मपोना वर्षा पंडीत, मोबाईल सेलचे पोकाँ राहुल गुंडु यांच्या पथकाने केली आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

युवा उद्योजकाचे अपहरण; नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नगर-मनमाड रस्त्यावर असलेल्या नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार घडला आहे. युवा...

ठपका ठेवून कारवाई करू नका; कर्मचाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात येणारे रँकिंग घसरल्याचा ठपका ठेवत मनपा आयुक्त...

सावधान! शिर्डी विमानतळ परिसरात ‘ती’ वस्तू वापर करण्यास बंदी..

शिर्डी । नगर सहयाद्री:- शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सापडले अडचणीत; दारू पाजून महिलेवर अत्याचार…

Crime News: हरियाणातील भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल...