spot_img
अहमदनगरटेलेंम नसल्याने कचरा गाडीचा अपघात; जखमी लोखंडे यांची मोठी मागणी

टेलेंम नसल्याने कचरा गाडीचा अपघात; जखमी लोखंडे यांची मोठी मागणी

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव रोड चौकात मंगळवारी सकाळी ८ वाजता घडलेल्या अपघातात नगरपरिषदेच्या कचरा वाहतूक गाडीच्या निष्काळजीपणामुळे लक्ष्मीनगर येथील रहिवासी साहेबराव लोखंडे गंभीर जखमी झाले आहेत. एमएच १६ सीसी ५०८७ क्रमांकाची ही गाडी टेलेंमशिवाय रस्त्यावर चालवली जात होती, अशी माहिती घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दिली.

प्राप्त माहितीनुसार, नेहमीप्रमाणे कचरा वाहतूक गाडी चौकातून जात असताना गाडीला टेलेंम नसल्याने साहेबराव लोखंडे यांना गाडीचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्यांचा तोल गेला आणि त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. नागरिकांनी तत्काळ मदत करत त्यांना रुग्णालयात दाखल केले.

या घटनेमुळे परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून, नगरपालिकेच्या गाड्यांच्या देखभालीबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. कचरा वाहतूक गाड्यांवर टेलेंम, ब्रेक लाईट, साईड मिरर यांसारखी मूलभूत सुरक्षा साधने नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढते आहे, असा आरोप स्थानिकांनी केला.

टेलेंम आणि ब्रेक लाईट बसवण्याची गरज
माझ्यासोबत जे घडलं ते उद्या कोणासोबतही होऊ शकतं. नगरपालिका प्रशासनाने तातडीने सर्व कचरा गाड्यांवर टेलेंम आणि ब्रेक लाईट बसवावेत. यामुळे भविष्यातील अपघात टळू शकतात.
– साहेबराव लोखंडे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

रामा तराळसह झावरे, खिलारी अडकले जाळ्यात; वाळू तस्करीच्या वादातून युवकावर प्राणघातक हल्ला प्रकरण

पारनेर | नगर सह्याद्री वासुंदे येथे वाळू तस्करीच्या वादातून युवकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीच्या...

… तर पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार; अमित शाहांनी मांडली तीन विधेयके

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत तीन महत्त्वाची...

शनिशिंगणापूर प्रशासनाचा मोठा निर्णय, शनी अमावस्येला ‘या’ ठिकाणी भाविकांना प्रवेशबंदी

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - शनिशिंगणापूर येथील शनिदेव मंदिरात दरवर्षी शनी अमावास्येला लाखो भाविक दर्शनासाठी...

खंडणीखोरांचा बंदोबस्त करा; कोणी केली मागणी?

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली उद्योगमंत्री सामंत यांची भेट अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर एमआयडीसीतील एक्साइड कंपनीच्या कच्च्या...