spot_img
देशस्विमिंगमध्ये गँगरेप; पोहण्याची प्रॅक्टिस भोवली, कुठे घडली घटना?

स्विमिंगमध्ये गँगरेप; पोहण्याची प्रॅक्टिस भोवली, कुठे घडली घटना?

spot_img

Crime राजधानी दिल्लीमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीतील नरेला भागात ही घटना घडली. दोन्ही मुलींना आरोपींनी एका खोलीमध्ये डांबून ठेवत त्यांच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्या.

पीडित मुलीच्या आईने सांगितले की, माझी ९ वर्षांची मुलगी नरेला येथे एका स्विमिंग पूलमध्ये पोहण्याची प्रॅक्टिस करण्यासाठी जात होती. ५ ऑगस्टला ती नेहमीप्रमाणे स्विमिंग करण्यासाठी गेली. त्याठिकाणी आरोपी अनिल आधीच उपस्थित होता. अनिल माझ्या मुलीला एका खोलीमध्ये घेऊन गेला. त्याठिकाणी आणखी एक १२ वर्षांची मुलगी होती. ती मुलगी देखील याठिकाणी स्विमिंग शिकण्यासाठी येत होती. आरोपीने दोन्ही मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर त्याठिकाणी दुसरा आरोपी मुनील आला. त्याने देखील दोन्ही मुलींवर अत्याचार केला.

सामूहिक अत्याचार केल्यानंतर आरोपींनी दोन्ही मुलींना घटनेबाबत कुणाला सांगितले तर तुम्हाला जीवे मारून टाकू अशी धमकी दिली. आरोपींनी धमकी दिल्यामुळे मुली प्रचंड घाबरल्या होत्या. त्यामुळे त्यांनी या घटनेबाबत कुटुंबीयांना देखील काहीच सांगितले नाही. ९ वर्षांची पीडित मुलगी स्विमिंगसाठी जायला नकार देत होती. तिची आई तिला सतत स्विमिंगला जा असे सांगत होती पण ती जायला नाही बोलत होती. त्यामुळे तिच्या आईने तिची विचारपूस केली असता रडत रडत मुलीने तिच्यासोबत घडलेली घटना सांगितली. त्यानंतर तिच्या आईने पोलिसांना फोन करून घरी बोलावून घेतलं.

पोलिसांनी दोन्ही मुलींची वैद्यकिय तपासणी केली असता त्यांच्यावर गँगरेप झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गँगरेप, धमकी देणे आणि डांबून ठेवल्याप्रकरणी तसंच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचे वय ३७ आणि २४ वर्षे आहे. पोलिस सध्या याप्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपींनी आणखी कोणत्या मुलींसोबत असं कृत्य केले की नाही याचा देखील तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संगमनेर तापलं! आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला, बाजारपेठ बंद आणि महायुतीचा मोर्चा, मंत्री विखे पाटील काय म्हणाले, पहा..

संगमनेर । नगर सहयाद्री:- गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यातील राजकीय वातावरण आधीच तणावपूर्ण असताना,...

गुलाल घेतल्याशिवाय मागे हटणार नाही; आझाद मैदानावरून मनोज जरागेंची मोठी गर्जना!

मुंबई | नगर सह्याद्री राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा...

रस्त्यावर अनधिकृत बांधकाम; 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, अहिल्यानगर क्राईम वाचा एका क्लिकवर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर येथील कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक रस्त्यावर अनधिकृतपणे भिंत...

रानात हत्येचा थरार! नवऱ्याचे बायकोवर धारदार शस्त्राने डझनभर वार, कारण काय?

Maharashtra Crime: परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील सोनपूर तांडा येथे पतीने पत्नीवर शेतामध्ये धारदार शस्त्राने...